Join us  

पनीरचे कुरकुरीत आप्पे, चव अशी की खातच राहाल.. करून पाहा सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2023 7:20 PM

Paneer veggies appe, try this easy recipe पौष्टीक स्नॅक्स खाण्याची इच्छा झाली, ट्राय करा पनीरचे क्रिस्पी आप्पे..

पनीर कोणाला आवडत नाही. पनीर हा प्रत्येकाचा आवडीचा पदार्थ. पनीरपासून विविध पदार्थ बनवले जातात. पनीर पकोडे, पनीर भुर्जी, पनीर मसाला. असे अनेक पदार्थ बनवले जातात. पनीर हे अगदी सहज उपलब्ध होणारे दुग्धजन्य पदार्थ आहे, जे घरीही बनवता येते.

पनीरमध्ये अनेक पौष्टीक घटक आढळतात. ज्यात प्रथिने, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी १२, कॅल्शियम, फोलेट, सोडियम, व्हिटॅमिन बी ६, झिंक, कॉपर यांचा समावेश आहे. रक्त वाढण्यापासून ते हाडं मजबूत करण्यापर्यंत याचे फायदे अनेक आहेत. या बहुगुणी पनीरपासून आपण पनीरचे क्रिस्पी आप्पे ही डिश बनवू शकता. आपण तांदळापासून तयार आप्पे खाल्लेच असतील. आता पनीरचे आप्पे ही डिश ट्राय करा. कमी साहित्यात बनणाऱ्या या रेसिपीला विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. चला तर मग या चविष्ट पदार्थाची कृती पाहूयात.

पनीरचे आप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य

किसलेले पनीर

डाळीचे पीठ

मीठ

धणे पूड

चिली फ्लेक्स

जिरं पावडर

लाल तिखट

बारीक चिरलेला कांदा

बारीक चिरलेली हिरवी मिरची

बारीक चिरलेली कोथिंबीर

दही

तेल

कृती

एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेले पनीर घ्या. त्या पनीरमध्ये डाळीचे पीठ, मीठ, धणे पूड, चिली फ्लेक्स, जिरं पावडर, लाल तिखट, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, दही, घालून संपूर्ण मिश्रण चांगले मिक्स करा. मिश्रण एका पिठाच्या गोळ्या प्रमाणे मळून घ्या. मिश्रण तयार झाल्यानंतर हातावर तेल लावा. आता त्या पीठाचे गोल - गोल आप्पे तयार करून घ्या.

दुसरीकडे आप्पे पॅनमध्ये तेल घाला. पॅन गरम झाल्यानंतर त्यात तयार पीठाचे गोळे ठेवा. आप्पेंना दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. चमचा अथवा टूथ - पिकच्या मदतीने आप्पेंना दोन्ही बाजूने फिरवत राहा. आप्पे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. आप्पे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढा. अशा प्रकरे गरमा गरम क्रिस्पी पनीरचे आप्पे खाण्यासाठी रेडी. आपण हा पदार्थ सॉस अथवा चटणीसह खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.