Lokmat Sakhi >Food > डेअरीसारखं पांढरंशुभ्र पनीर घरीच बनेल; दुधात १ पदार्थ मिसळा, पाहा मऊ पनीर करण्याच्या ट्रिक्स

डेअरीसारखं पांढरंशुभ्र पनीर घरीच बनेल; दुधात १ पदार्थ मिसळा, पाहा मऊ पनीर करण्याच्या ट्रिक्स

Paneer making steps at home :  घरी बनवलेलं पनीर वापरून तुम्ही पनीर बुर्जी, पनीरची भाजी, पनीर चिल्ली असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 12:13 PM2023-09-27T12:13:59+5:302023-09-27T15:16:36+5:30

Paneer making steps at home :  घरी बनवलेलं पनीर वापरून तुम्ही पनीर बुर्जी, पनीरची भाजी, पनीर चिल्ली असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता.

Paneer making steps at home : How to make paneer at home Homemade Paneer Recipe | डेअरीसारखं पांढरंशुभ्र पनीर घरीच बनेल; दुधात १ पदार्थ मिसळा, पाहा मऊ पनीर करण्याच्या ट्रिक्स

डेअरीसारखं पांढरंशुभ्र पनीर घरीच बनेल; दुधात १ पदार्थ मिसळा, पाहा मऊ पनीर करण्याच्या ट्रिक्स

 पनीरची भाजी, पनीर रोल,  असे अनेक पदार्थ खाण्यात येतात. घरी पनीरचा कोणताही पदार्थ बनवायचं म्हटलं की बाहेरून पनीर आणलं जातं. विकतचं पनीर अनेकदा भेसळयुक्त असण्याची  शक्यता असते. सणउत्सवांच्या काळात बऱ्याच दुकानांमध्ये भेसळयुक्त पनीर सर्रास विकलं जातं. (How to make paneer at home)

अशा प्रकारचं पनीर खाल्ल्यामुळे  पोटाचे त्रास उद्भवू शकतात. (Homemade Paneer Recipe)घरच्याघरी पनीर बनवण्यासाठी तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार फक्त दूध लागेल ते प्रत्येकाच्याच फ्रिजमध्ये असते.  घरी बनवलेलं पनीर वापरून तुम्ही पनीर बुर्जी, पनीरची भाजी, पनीर चिल्ली असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकता. (Paneer making steps at home)

१) घरात पनीर बनवण्यासाठी सगळ्यात १ ते २ लिटर दूध उकळण्यासाठी ठेवा. दूधाला उकळ फुटल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. लिंबू पिळत असताना चमच्याच्या साहाय्याने दूध ढवळत राहा. 

२) लिंबू पिळल्यानंतर दुधामध्ये गुठळ्या तयार  होतील आणि दूधाचे पाणी वेगळे होईल. दूधाचे जाड जाड गोळे झाले आणि पाणी पूर्ण वेगळे झाले की गॅस बंद करा. त्यानंतर  एका मोठ्या गाळणीच्या साहाय्याने पाणी दूधाचा जाडसर भाग वेगळा करा. 

वाटीभर गव्हाच्या पीठाची करा खुसखुशीत चकली; काटेरी-खमंग चकली करण्याची झटपट रेसिपी

३) त्यानंतर दूधाचा गोळा कापडावर ठेवा आणि व्यवस्थित पिळून घ्या. कापडात व्यवस्थित बांधून पनीर बाजूला ठेवून द्या. पनीरच्या कापडावर जड वजन ठेवा. 

४) १ ते २ तासाने ते वजन काढून पनीर ज्या कापडात बांधून ठेवले ते कापड व्यवस्थित मोकळे करा. त्यानतंर पनीर एका ताटात काढून घ्या आणि त्याचे चौकोनी  तुकडे करा. 

५) पनीरवर तुम्ही जितंक जास्त वजन ठेवाल तितकंच घट्ट पनीर तयार होईल.  हे पनीर पाण्यात घालून तुम्ही फ्रिजमध्ये ठेवू शकता. 

१) तुम्ही दह्यापासूनही पनीर बनवू शकता. यासाठी  मेथी आणि १ कप दह्याची आवश्यकता असेल.

२) पनीरच्या पाण्याच्या  पोषक तत्व असतात. म्हणूनच पनीर फेकण्याऐवजी तुम्ही पीठ मिळताना त्यात हे पाणी घालू शकता किंवा सूपमध्ये हे पाणी घाला यामुळे सूपचं क्रिमी टेक्स्चर होईल.

३) पनीर बांधून ठेवण्याासठी पातळ कॉटनचा कापड निवडा.

Web Title: Paneer making steps at home : How to make paneer at home Homemade Paneer Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.