Join us  

ना कणिक मळायची झंझट ना सारण करायची, झटपट बनवा पनीर पराठा, इतका चविष्ट की खातच राहाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 12:43 PM

Paneer Paratha Recipe : How to make paneer paratha : स्टफिंग न बनवता देखील १० मिनिटांत करा न लाटता तयार होणारा चविष्ट पनीर पराठा... पनीर पराठा बनवणे झाले सोपे...

काहीवेळा घरात काही भाजी नसली किंवा वेगळं खावंसं वाटलं तर आपण झटपट बनवून तयार होणाऱ्या पराठ्याला पसंती देतो. आपल्याकडे सकाळच्या नाश्त्याला बरेचदा वेगवेगळ्या प्रकारचे पराठे केले जातात. आलू पराठा, पालक पराठा, मेथी पराठा, पनीर पराठा असे पराठ्यांचे अनेक प्रकार आपण आवडीने खातो. पराठे बनवण्याच्या पद्धती अनेक असतात. चपातीसारखे गव्हाचे कणिक मळून त्यात भाज्यांचे स्टफिंग भरून पराठा बनवला जातो किंवा पिठात भाज्या मिक्स करून देखील पराठा बनवता येतो(Paneer Paratha).

पराठ्यांमध्ये पनीर पराठा हा तसा सगळ्यांच्या विशेष आवडीचा. हा पराठा आवडीचा असून देखील तो बनवण्यासाठी तितकाच खटाटोप करावा लागतो. पनीर पराठा (Paneer Paratha Recipe) बनवण्यासाठी त्याचे कणिक मळावे लागते. यासोबतच पनीरचे स्टफिंग बनवावे लागते. याच कारणांमुळे शक्यतो घाईच्या वेळी आपण पनीर पराठे (Paneer Paratha Homemade Easy to Make Recipe) बनवणे टाळतो. पण जर आपल्याला जास्त मेहेनत न घेता, अगदी कमी वेळात झटपट पनीर पराठे तयार करायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. आपण कणिक न मळता, स्टफिंग न बनवता, न लाटता देखील पनीर पराठे बनवू शकतो. याची सोपी रेसिपी पाहूयात(how to make paneer paratha).    

साहित्य :- 

१. किसलेले पनीर - १ कप२. गव्हाचे पीठ - २ कप ३. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)४. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)५. मीठ - चवीनुसार ६. जिरे - १ टेबल्स्पून ७. ओवा - १ टेबलस्पून ८. गरम मसाला - १ टेबलस्पून ९. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून १०. पाणी - गरजेनुसार ११. तेल / बटर / तूप - २ ते ३ टेबलस्पून 

कृती :- 

१. एका मोठ्या बाऊलमध्ये किसलेले पनीर घेऊन त्यात गव्हाचे पीठ घालावे. २. आता या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, जिरे, ओवा, गरम मसाला, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालून घ्यावे. ३. त्यानंतर या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. ४. पनीर पराठ्याचे हे बॅटर एकदम पातळ किंवा जाड न करता मध्यम कंन्सिस्टंसीचे असावे. ५. गॅसच्या मंद आचेवर पॅन ठेवून तो गरम झाल्यावर त्याला तेल लावून डोशासारखे गोलाकार आकारात हे बॅटर तव्यावर ओतावे. ६. दोन्ही बाजुंनी तेल लावून हा पराठा व्यवस्थित खरपूस भाजून घ्यावा. 

चटपटीत अमृतसरी पनीर भुर्जीचा करा झक्कास बेत, बनवायला सोपी चवीला तितकीच टेस्टी...  

अशाप्रकारे आपण पराठ्यासाठीचे स्टफिंग किंवा कणिक न मळता देखील झटपट होणारा पनीर पराठा बनवू शकतो. हा गरमागरम पराठा सॉस, चटणी किंवा लोणच्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.

टॅग्स :अन्नपाककृती