Lokmat Sakhi >Food > पोळ्या खूप उरल्या? भरपूर भाज्या घालून ५ मिनिटांत करा चटपटीत पनीर रोल, मुलांसाठी मस्त टेस्टी ट्रीट

पोळ्या खूप उरल्या? भरपूर भाज्या घालून ५ मिनिटांत करा चटपटीत पनीर रोल, मुलांसाठी मस्त टेस्टी ट्रीट

Paneer Roll Recipe From Leftover Roti Or Chapati: पोळ्या खूप उरल्या असतील तर त्याचा नेहमीसारखा कुस्करा करण्याऐवजी चटपटीत पनीर रोल करा. बघा एकदम सोपी रेसिपी. (Tasty paneer roll recipe in just 5 minutes)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2023 09:17 AM2023-10-06T09:17:34+5:302023-10-06T09:20:02+5:30

Paneer Roll Recipe From Leftover Roti Or Chapati: पोळ्या खूप उरल्या असतील तर त्याचा नेहमीसारखा कुस्करा करण्याऐवजी चटपटीत पनीर रोल करा. बघा एकदम सोपी रेसिपी. (Tasty paneer roll recipe in just 5 minutes)

Paneer roll recipe from leftover roti or chapati, How to make paneer roll, Tasty paneer roll recipe in just 5 minutes | पोळ्या खूप उरल्या? भरपूर भाज्या घालून ५ मिनिटांत करा चटपटीत पनीर रोल, मुलांसाठी मस्त टेस्टी ट्रीट

पोळ्या खूप उरल्या? भरपूर भाज्या घालून ५ मिनिटांत करा चटपटीत पनीर रोल, मुलांसाठी मस्त टेस्टी ट्रीट

Highlightsमुलांना डब्यात देण्यासाठीही हा पदार्थ चांगला आहे. शिवाय संध्याकाळी थोडीशीच भूक असेल तर चटपटीत स्नॅक्स म्हणूनही पनीर रोल पटकन करून देऊ शकता.

मुलांना नेहमीच काहीतरी वेगळं खावंसं वाटतं. तेच ते पोळी- भाजी खायला ते कंटाळा करतात. अगदी मुलांचं कशाला... आपल्या मोठ्या माणसांचंही बऱ्याचदा तसंच असतं. आपल्यालाही तेच ते भाजी पोळी खाण्याचा कंटाळा येतोच. कधी कधी सकाळच्या पोळ्या खूप उरलेल्या (leftover roti or chapati) असतात आणि रात्री थोडंसंच खायचं असतं. अशावेळी ही पनीर रोल रेसिपी तुम्ही करू शकता (How to make paneer roll). मुलांना डब्यात देण्यासाठीही हा पदार्थ चांगला आहे. शिवाय संध्याकाळी थोडीशीच भूक असेल तर चटपटीत स्नॅक्स म्हणूनही पनीर रोल पटकन करून देऊ शकता. अगदी ५ मिनिटांत पनीर रोल कसे करायचे ते आता पाहूया (Tasty paneer roll recipe in just 5 minutes)....

 

पनीर रोल करण्याची रेसिपी

साहित्य

उरलेल्या पोळ्या

पनीरचे चौकोनी काप एक वाटी

कोबी, सिमला मिरची, गाजर अशा बारीक चिरलेल्या भाज्या

आलं- लसूण पेस्ट अर्धा टेबलस्पून

१ टेबलस्पून टोमॅटो सॉस

१ टेबलस्पून सोया सॉस

अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा

अर्धा टेबलस्पून तेल

२ टेबलस्पून तूप

 

रेसिपी

सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवा.

आपण खातो त्या सफरचंदावर मेणाचा थर किती आहे, हे तपासण्याची घ्या १ सोपी पद्धत

त्यात तेल टाका. तेल थोडं तापलं की कांदा सोडून इतर सगळ्या भाज्या आणि पनीरचे काप एकदम टाका आणि  एखादा मिनिट  परतून घ्या.

त्यानंतर त्यात दोन्ही सॉस, गरजेपुरतं तिखट आणि चवीनुसार मीठ टाका. आवडत असेल तर तुम्ही त्यात मॅगी मसाला किंवा नूडल्स मसालाही टाकू शकता.

 

हे सगळं मिश्रण एखादा मिनिट परतून झालं की गॅस बंद करा. 

आता एक तवा तापायला ठेवा. त्यावर तूप टाका आणि पोळी खालून वरून गरम करून घ्या.

फक्त ५०० रुपयांत घ्या लेटेस्ट फॅशनच्या ट्रेण्डी जीन्स, एकदम भारी जीन्स ती ही खिशाला परवडणाऱ्या किमतीत

आता तव्यावरच्या पोळीचा जो भाग वर आहे, त्याला सॉस लावा. आपण केलेले पनीर आणि भाज्यांचे मिक्स त्या पोळीवर अगदी मधोमध ठेवा. आणि दोन्ही बाजुंनी पोळी दुमडून त्याचा रोल करा.  

त्या रोलला पुन्हा वरच्या बाजूने तूप लावलं की झाला गरमागरम पनीर रोल तयार.... करून पाहा.. मुलं मिटक्या मारत फस्त करतील.

 

Web Title: Paneer roll recipe from leftover roti or chapati, How to make paneer roll, Tasty paneer roll recipe in just 5 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.