पावसाळा सुरु झाला की काहीतरी चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. पावसाळ्याच्या थंड वातावरणात गरमा - गरम, चमचमीत पदार्थ खायला मिळालं तर, अनेकांचा संपूर्ण दिवस आनंदात जातो. पावसाळ्यात भजी खायला अनेकांना आवडते. पण आपण कधी चमचमीत पनीर रवा फ्राय ही रेसिपी ट्राय करून पाहिली आहे का?
पनीरचे अनेक प्रकार केले जातात. पनीरपासून तयार पदार्थ अनेकांना आवडतात. पण कदाचित कमी लोकांनी पनीर रवा फ्राय ही रेसिपी ट्राय करून पाहिली असेल. ही रेसिपी चवीला अत्यंत स्वादिष्ट लागते. जर आपल्या भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, पनीर रवा फ्राय ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहा(paneer tawa fry recipe | paneer starter recipe | paneer fry).
पनीर रवा फ्राय करण्यासाठी लागणारं साहित्य
मलाई पनीर
मीठ
कोकम आगळ
आलं - लसूण पेस्ट
तिखट
हळद
शिळ्या चपातीचं काय करावं सुचत नाही? १० मिनिटात करा कुरकुरीत डोसा, चव भन्नाट - टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन
मैदा
रवा
लाल तिखट
कृती
सर्वप्रथम पनीरवर चवीनुसार मीठ, कोकम आगळ लावून कोट करा. आता एका प्लेटमध्ये आलं - लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, मैदा, कोकम आगळ मिक्स करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट पनीरवर लावून कोट करा.
पनीरवर कोट लावल्यानंतर १५ मिनिटांसाठी मॅरिनेशनसाठी झाकून ठेवा. एका प्लेटमध्ये एक कप रवा, एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. आता कोट केलेलं पनीर रवाच्या मिश्रणात मिसळून चांगले कोट करा.
नाश्त्याला करा इन्स्टंट रवा ढोकळा, गुजराथी रेसिपी करायला सोपी - पोटभर आणि पौष्टिक
दुसरीकडे तव्यावर २ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्यात मॅरिनेटेड पनीर घालून दोन्ही बाजूने फ्राय करून घ्या. अशा प्रकारे चमचमीत पनीर रवा फ्राय खाण्यासाठी रेडी.