Join us  

जन्माष्टमीच्या प्रसादासाठी करा दोन प्रकारच्या पारंपरिक पंजिरी, कृष्णाला आवडणारा खास पदार्थ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 2:27 PM

Simple Recipe of Preparing Panjiri: कृष्ण जन्माष्टमीच्या (janmashtami) प्रसादामध्ये पंजिरीचे विशेष महत्त्व असते. अवघ्या १५ ते २० मिनिटांत तयार होणारा हा नैवेद्य करायलाही सोपा आहे... त्याच्याच या २ खास रेसिपी.

ठळक मुद्देया २ प्रकारच्या पंजिरी विशेष आवडीने खाल्ल्या जातात. यापैकी जी रेसिपी तुम्हाला आवडेल आणि सोपी वाटेल ती करून बघा.

सत्यनारायणाच्या पुजेचा प्रसाद, देवीला नैवेद्य किंवा मग श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी विशेष भोग म्हणून पंजिरी ( Panjiri bhog to shri krishna) केली जाते. नैवेद्यामध्ये या पदार्थाला विशेष मान आहे. अनेक ठिकाणी जन्माष्टमीच्या दिवशी तर कृष्णासाठी आवर्जून पंजिरी (Panjiri Recipe) केली जाते. हा पदार्थ अगदी झटपट तयार होतो. शिवाय त्यासाठी खूप काही विशेष मेहनतही घ्यावी लागत नाही. या पदार्थाचा आणखी एक फायदा म्हणजे एखाद्या पदार्थाचं प्रमाण कमी- जास्त होऊन पंजिरीची बिघडेल, असं यात मुळीच नसतं. त्यामुळे अगदी पहिल्यांदा ट्राय करणार असाल, तरीही हा पदार्थ उत्तमच जमेल. म्हणूनच या बघा पंजिरी करण्याच्या काही सोप्या रेसिपी. प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने पंजिरी करतात. त्यातही या २ प्रकारच्या पंजिरी (2 types of panjiri) विशेष आवडीने खाल्ल्या जातात. यापैकी जी रेसिपी तुम्हाला आवडेल आणि सोपी वाटेल ती करून बघा.(How to make panjiri for janmashtami naivedya?)

 

१. कणकेपासून केलेली पंजिरी (Aata panjiri)साहित्यएक कप गव्हाचे पीठ, अर्धा कप गूळाची पावडर, पाव कप शुद्ध तूप, २ टीस्पून वेलची पावडर, ७ ते ८ तुळशीची पाने, तुमच्या आवडीचा सुकामेवा पाव कप, थोडंसं सुकं खोबरं, पाव कप मखाना.रेसिपी- गॅसवर कढई तापत ठेवा. त्यात तूप टाका

हिरव्या टोमॅटोची झणझणीत चटकदार चटणी, चवबदल म्हणून भन्नाट पदार्थ- घ्या रेसिपी- तूप तापलं की त्यात गव्हाचे पीठ टाका आणि ते मंद आचेवर तपकिरी रंगांचे होईपर्यंत परतून घ्या. पीठ परतून घेताना खाली कढईला लागणार नाही, याची काळजी घ्या.- आता त्यात सुकामेवा टाका आणि सगळे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्या. सुकामेवा परतून झाला की गॅस बंद करून टाका आणि हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.- थंड झाल्यावर त्यात गुळाची पावडर टाका. तुमच्या आवडीनुसार गुळ कमी जास्त प्रमाणात टाकू शकता. - त्यानंतर वेलची पावडर टाका. सगळे मिश्रण हलवून घ्या आणि वरतून तुळशीची पानं टाका. नैवेद्याची पंजिरी झाली तयार. 

 

२. धणे पंजिरी (Dhaniya panjiri)साहित्य अर्धा कप मखाना, अर्धा कप धणे पावडर, अर्धा कप पिठीसाखर, पाव कप खोबऱ्याचा किस, ३ टेबलस्पून तूप, बदाम, काजू, खरबूज बी, मनुका असा सगळा सुकामेवा पाव कप, वेलची पूड २ टी स्पूनरेसिपी- कढई गॅसवर तापत ठेवा. कढई तापली की त्यात खोबऱ्याचा किस टाकून परतून घ्या आणि तो एका प्लेटमध्ये काढून घ्या.

गणपतीसाठी पूजा साहित्याच्या वस्तू, ऑनलाईन स्वस्त आणि मस्त; खरेदीसाठी पाहा आकर्षक पर्याय - आता कढईत तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यात मखाने टाकून फ्राय करा. गॅस मंद ठेवावा. परतून झाले की ते एका बाऊलमध्ये काढून घ्या.- गरज पडल्यास पुन्हा तूप टाका आणि त्यात काजू- बदाम- मनुका टाकून परतून घ्या आणि कढईतून बाजूला काढून ठेवा.- आता पुन्हा तूप टाका, त्यात धणे पावडर टाकून २ ते ३ मिनिटे भाजून घ्या. यानंतर त्यात सुकामेवा, नारळाचा किस असं सगळंच टाका आणि व्यवस्थित परतून घ्या. एखादा मिनिट परतून घेतल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या.- हे मिश्रण जेव्हा थंड होईल, तेव्हाच त्यात साखर टाका आणि सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या. धने पंजिरी झाली तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीजन्माष्टमी