काहींसाठी चहा (Tea) म्हणजे स्वर्गसुख (Tea Lover). अनेकांची सकाळ चहाशिवाय होत नाही (Pankaj Tripathi). चहा पिताच शरीराला काम करण्याची उर्जा मिळते (How to make Tea). दिवसभरात २ वेळेस तरी चहा हवाच. चहामध्येही अनेक प्रकार आहेत. ज्यामध्ये मसाला चहा हा फार फेमस आहे. पण काहींना घरात मसाला चहा बनवायला जमत नाही.
चहा बनवण्याचं गणित बिघडतं. कधी मसाला कमी पडतो, साखर कमी पडते, दूध कमी पडते, किंवा चहा किती वेल उकळवत ठेवायचं हे कळत नाही. ज्यामुळे मसाला चहा हा बेचव लागते. जर आपल्याला विकतच्या मसाल्याचा वापर न करता, घरगुती मसाल्यात फक्कड मसाला चहा करायचा असेल, तर अभिनेता पंकज त्रिपाठीने सांगितलेली रेसिपी फॉलो करून पाहा. मिनिटात ठेल्यावर मिळतो तसा चहा तयार होईल(Pankaj Tripathi’s Special Masala Tea Recipe).
फक्कड पंकज त्रिपाठी स्टाईल चहा बनवण्यासाठी लागणारं साहित्य
लवंग
आलं
वेलची
तमालपत्र
चहापत्ती
साखर
पडदे धुण्याची पाहा सोपी युक्ती- २ टिप्स, रिंग्ज गंजल्या असतील तरी पडदे चटकन होतील स्वच्छ
दूध
पाणी
कृती
सर्वात आधी गॅसवर भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ कप पाणी घाला. दुसरीकडे खलबतं घ्या, त्यात २ लवंग, १ इंच आलं, वेलची, आणि तमालपत्र घालून ठेचून घ्या. अशाप्रकारे घरगुती मसाला तयार होईल.
८ पदार्थ खा - उडालेली झोप, सतत थकवा आणि चिडचिड जादू झाल्यासारखे प्रॉब्लम होतील गायब
घरगुती मसाला पाण्यामध्ये घाला. नंतर त्यात २ छोटे चमचे चहापत्ती घाला. गॅस मिडीयम फ्लेमवर ठेवा. २ मिनिटांनंतर त्यात आवडीनुसार साखर घाला. २ मिनिटांनंतर त्यात दूध घाला, आणि त्यावर झाकण ठेवा. २ मिनिटांनंतर उकळी येईल, आणि शेवटी गॅस बंद करा. एक कप घ्या, त्यावर गाळणी ठेवा, चहा त्यात गाळून घ्या. अशा प्रकारे फक्त पंकज त्रिपाठी स्टाईल चहा पिण्यासाठी रेडी.