Lokmat Sakhi >Food > Papad Dosa Recipe: सादळलेल्या पापडाचा मस्त कुरकुरीत डोसा, शेफ कुणाल कपूर यांची पावसाळा स्पेशल रेसिपी- करा पापड डोसा

Papad Dosa Recipe: सादळलेल्या पापडाचा मस्त कुरकुरीत डोसा, शेफ कुणाल कपूर यांची पावसाळा स्पेशल रेसिपी- करा पापड डोसा

How to make Papad Dosa?: उडीद डाळ आणि तांदूळाचा डोसा नेहमीच करता आणि उडीद पापडांचा (papad) डोसा करून बघा... शेफ कुणाल कपूर (Chef Kunal Kapoor) सांगत आहेत ही खास मान्सून स्पेशल रेसिपी.(monsoon special recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 02:05 PM2022-06-27T14:05:10+5:302022-06-27T14:06:08+5:30

How to make Papad Dosa?: उडीद डाळ आणि तांदूळाचा डोसा नेहमीच करता आणि उडीद पापडांचा (papad) डोसा करून बघा... शेफ कुणाल कपूर (Chef Kunal Kapoor) सांगत आहेत ही खास मान्सून स्पेशल रेसिपी.(monsoon special recipe)

Papad Dosa Recipe: How to make Papad Dosa? Special dosa recipe by Chef Kunal Kapoor, Best breakfast recipe | Papad Dosa Recipe: सादळलेल्या पापडाचा मस्त कुरकुरीत डोसा, शेफ कुणाल कपूर यांची पावसाळा स्पेशल रेसिपी- करा पापड डोसा

Papad Dosa Recipe: सादळलेल्या पापडाचा मस्त कुरकुरीत डोसा, शेफ कुणाल कपूर यांची पावसाळा स्पेशल रेसिपी- करा पापड डोसा

Highlightsनाश्त्याला कधी कधी काय करावं, असा प्रश्न पडतोच, त्यावेळी ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करून बघा.

तांदूळ आणि उडीद डाळ यांच्य मिश्रणापासून तयार झालेले डोसे (dosa recipe) तर आपण नेहमीच खातो. त्यात बदल म्हणून मग कधी झटपट होणारा रवा डोसा (rava dosa), ओट्सपासून बनवलेला कुरकुरीत डोसा, मुगाच्या डाळीचे डोसे किंवा मग तांदळाच्या पिठाचे डोसे असे प्रकारही बऱ्याचदा केले जातात. आता या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि आतापर्यंत बऱ्याच जणांनी ऐकला नसेल असा एक खास डोसा प्रकार करून बघा. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर पापड डोसा (How to make Papad Dosa?) ही एक खास रेसिपी शेअर केली आहे. नाश्त्याला (Best breakfast recipe) कधी कधी काय करावं, असा प्रश्न पडतोच, त्यावेळी ही वेगळी रेसिपी नक्की ट्राय करून बघा.(papad dosa recipe in marathi)

 

पावसाळ्यात बऱ्याचदा असं होतं की उडीद डाळीचे पापड सादळून जातात. ओलसर होतात. भाजल्यावरही ते विशेष कुरकुरीत लागत नाहीत. त्यामुळे मग खाल्लेही जात नाहीत. अशा पापडांचा उपयोग पापड डोसा करण्यासाठी करता येतो. शिवाय बऱ्याचदा असंही होतं की पापड करताना काहीतरी कमीजास्त होतं आणि मग पापडाचे तुकडे पडतात. किंवा मग आपल्याकडूनच पापड चांगले ठेवले नाहीत, त्यावर ओझं पडलं तर ते तुटून जातात. अशा तुटलेल्या पापडांचा उपयोगही आपल्याला पापड डोस करण्यासाठी करता येईल. शिवाय शेफ कुणाल कपूर यांनी ही रेसिपी सांगितली असल्याने ती चवदार होईलच, अशी आशा करायला हरकत नाही.

 

उडीद डाळ खाण्याचे फायदे 
- उडदाच्या डाळीमध्ये खनिजे, व्हिटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असते.
- या डाळीत कोलेस्टरॉल अतिशय कमी असते.
- उडीद डाळीतून कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोहदेखील भरपूर प्रमाणात मिळते.
- केस खूप गळत असतील तर उडीद डाळ खाणे फायद्याचे ठरते.
- रक्तातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी उडीद डाळ फायद्याची ठरते.

 

कसा करायचा पापड डोसा?
- पापड डोसा करण्यासाठी सगळ्यात आधी पापडाचे एक- दोन तुकडे करा आणि ते एका भांड्यात टाका.
- त्यात थोडं पाणी टाकून पापड काही मिनिटांसाठी भिजू द्या.
- पापड भिजले की १५ ते २० मिनिटांनी ओले झालेले पापड पाण्यासहीत मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याचं पीठ बनवून घ्या.
- हे पीठ खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको.
- आता गॅसवर तवा तापायला ठेवा.
- तवा तापल्यानंतर त्यावर तेल लावा आणि थोडं पाणी शिंपडा.
- त्यानंतर आपण केलेलं पापडाचं पीठ तव्यावर टाका आणि पळीने ते तवाभर पसरवून घ्या.
- काही सेकंद त्यावर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. त्यानंतर डोसाच्या वरच्या बाजूने त्यावर बटर लावा.
- चवदार, कुरकुरीत पापड डोसा झाला तयार. 

 

Web Title: Papad Dosa Recipe: How to make Papad Dosa? Special dosa recipe by Chef Kunal Kapoor, Best breakfast recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.