काही लोक खाण्यापिण्याचे खूपच शौकीन असतात. बदलत्या काळात खाण्यापिण्यातही बरेच बदल झालेले पाहायला मिळाले. आजकाल लोक खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये बरेच प्रयोग करतात. यातील प्रयोग तुफान यशस्वी होतात तर काही प्रयोग फसतात सध्या सोशल मीडियावर चहाची आईस्क्रीम, गोलगप्पा पराठा, पालरे जी बिस्कीट लाडू अशा अनेक रेसेपीज व्हायरल होत आहेत. (Parle g biscuit ladoo recipe)
अलिकडेच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महिला पारले जी बिस्कीट बनवताना दिसत आहे. हे पाहून सोशल मीडिया युजर्स चकीत झाले आहेत. कढईत तेल गरम करून पारले जी बिस्किट्स तळून घेते. बिस्किटांचा रंग बदलेपर्यंत ते फ्राय केले जातात. बिस्कीट्स हलके तळून त्याचा चुरा केला जातो त्यानंतर कढईत साखर घालून त्यात पाणी मिसळलं जातं.
१ नंबर! लेकानं वडीलांना वाढदिवसाला 'ड्रिम बाईक' सरप्राईज दिली; रिएक्शन पाहून डोळे पाणावतील
त्यानंतर ड्रायफ्रुट्सही घातले जातात. हे मिश्रण साखरेत व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर लाडवांचा आकार दिला जातो. या लाडूंची चव कशी लागते याबद्दल प्रतिक्रिया आलेला नाही. पण ही रेसेपी पाहून नेटिझन्सनी नाराजी व्यक्त केली आहे. आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.