Lokmat Sakhi >Food > मूठभर शेंगदाणे अन् १ कांदा चिरून करा स्वादीष्ट चटणी; ५ मिनिटांत बनेल- घ्या सोपी रेसिपी

मूठभर शेंगदाणे अन् १ कांदा चिरून करा स्वादीष्ट चटणी; ५ मिनिटांत बनेल- घ्या सोपी रेसिपी

Peanut Chutney Recipe : तुम्ही घरच्याघरी ५ मिनिटात सोप्या पद्धतीनं चटणी बनवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 06:06 PM2023-06-27T18:06:31+5:302023-06-27T18:53:34+5:30

Peanut Chutney Recipe : तुम्ही घरच्याघरी ५ मिनिटात सोप्या पद्धतीनं चटणी बनवू शकता.

Peanut Chutney Recipe : How to make 10 Minute Peanut Chutney Recipe | मूठभर शेंगदाणे अन् १ कांदा चिरून करा स्वादीष्ट चटणी; ५ मिनिटांत बनेल- घ्या सोपी रेसिपी

मूठभर शेंगदाणे अन् १ कांदा चिरून करा स्वादीष्ट चटणी; ५ मिनिटांत बनेल- घ्या सोपी रेसिपी

नेहमी तेच खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खावंसं वाटतं. (Cooking Hacks) अशावेळी तोंडी लावणीसाठी चटणी किंवा लोणचं, असेच जेवणाची मजाच वेगळी असते. (Peanut chutney recipe) चटणी बनवण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणून बरेचजण चटणी बनवणं टाळतात पण तुम्ही घरच्याघरी ५ मिनिटात सोप्या पद्धतीनं चटणी बनवू शकता. (How to make peanut chutney) शेंगदाण्याची ओली चटणी कशी बनवयाची ते पाहूया. 

साहीत्य

१) शेंगदाणे - १ वाटी

२) टोमॅटो - १ उभा चिरलेला

३) कांदा - १ बारीक चिरलेला

४) लसूण - ३ ते ४

५) लाल मिरच्या - ३ ते ४

६) मीठ- चवीपुरता

७) चिंच- आवडीनुसार

फोडणीसाठी

तेल-  ४ ते ५ टिस्पून

भाजलेली चण्याची डाळ- २ टिस्पून

उडीदाची डाळ - २ टिस्पून

मोहरी- १ टिस्पून

जीरं- २ टिस्पून

कढीपत्ता - ५ ते ६

कृती

1) सगळ्यात आधी एका कढईत शेंगदाणे भाजून घ्या.  तापलेल्या कढईत तेल  घालून त्यात डाळी, कांदे, लसूण, आलं, लाल मिरच्या घालून तळून घ्या.

2) हे मिश्रण फ्राय झाल्यानंतर त्यात टोमॅटो आणि १ चमचा मीठ घाला मग शेंगदाणे आणि चिंच घालून हे मिश्रण बारीक दळून घ्या.  तयार मिश्रणावर मोहोरी, जीरं, डाळी, कढीपत्त्याची फोडणी घाला.

3) तयार आहे लज्जतदार, चविष्ट शेंगदाण्याची चटणी ही चटणीचा आस्वाद  कोणत्याही  जेवणासह घेऊ शकता. इडली, भाकरी. चपाती कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी ही चटणी मस्त पर्याय आहे.

शेंगदाणे आणि दह्याची चटणी कशी बनवायची?

1) ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे बारीक करण्यासाठी घाला. 

२) नंतर त्यात दही, आलं- मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस, जीरं, मीठ घालून एकत्र करा.  ही चटणी तुम्ही उपवासाच्या दिवशीसुद्धा खाऊ शकता.

Web Title: Peanut Chutney Recipe : How to make 10 Minute Peanut Chutney Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.