भारतीय पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहे (Indian Food). यामध्ये लाडू फार फेमस आहे (Peanut Laddoo). भारतात विविध भागात विविध प्रकारचे लाडू केले जातात. लाडू खायला कोणाला नाही आवडत (Cooking tips). बुंदी, शेव, ड्रायफ्रुट्स यासह शेंगदाण्याचेही लाडू केले जातात. शेंगदाण्याचे लाडू पौष्टीक तर असतातच, शिवाय शेंगदाण्याचे लाडू खाण्याचे अनेक फायदेही आहेत (Health Tips).
अनेक स्वयंपाकघरात शेंगदाण्याच्या कुट करून ठेवलेला डब्बा असतोच (Food). जर आपल्याला झटपट आणि गोड खाण्याची क्रेविंग्स होत असेल तर, शेंगदाण्याचे पौष्टीक लाडू तयार करा. हे लाडू बनवायला सोपे आणि खायला पौष्टीक असतात(Peanut ladoo recipe | Peanut ladoo recipe with jaggery).
सराफाकडे न जाता सोन्याचे दागिने चमकतील; फक्त बेकिंग सोड्याचा 'असा' वापर करा; मिनिटात दागिने स्वच्छ
शेंगदाण्यामध्ये लोह, मॅंगनीज, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम आणि सेलेनियम असते. जर आपले ऐन तारुण्यात हाडं दुखत असतील तर, नियमित एक लाडू खा. लाडू खाल्ल्याने हाडांना बळकटी मिळेल. शिवाय आरोग्यालाही फायदा होईल.
शेंगदाण्याचा लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य
शेंगदाणे
वेलची
गुळ
कृती
सर्वात आधी कढईमध्ये शेंगदाणे घालून भाजून घ्या. शेंगदाणे भाजल्यानंतर थोडं थंड होण्यासाठी ठेवा. त्याची फोलपाटं हाताने काढा. आणि फोलपाटं वेगळे करा.
जेवणानंतर की जेवणाआधी? ताक नेमकं कधी प्यायल्याने फायदा होतो? ताक प्या - करा वजन कमी झरझर
आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, वेलची, एक वाटी किसलेला गुळ घालून मिक्सर फिरवून घ्या. तयार पावडर एका प्लेटमध्ये काढून घ्या. हाताला थोडे तूप लावून लाडू छान वळवून घ्या. अशा प्रकारे शेंगदाण्याचे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी. आपण नियमित एक लाडू खाऊ शकता. यामुळे नक्कीच आरोग्याला फायदा होईल, आणि हाडांनाही बळकटी मिळेल.