Lokmat Sakhi >Food > गूळ शेंगदाणे आहेत ना घरात, मग ' असा ' करा हिवाळ्यातील सुपरफूड खाऊ, पौष्टिक आणि स्वस्त भारी...

गूळ शेंगदाणे आहेत ना घरात, मग ' असा ' करा हिवाळ्यातील सुपरफूड खाऊ, पौष्टिक आणि स्वस्त भारी...

Peanut Ladoo Recipe : Shengdana Ladoo : Peanut Ladoo Recipe Healthy & Tasty No Sugar Laddu : Shengdana Laddu Quick Energy Booster For Winter Season : थंडीच्या दिवसांत सारखी भूक लागते यासाठी खावेत असे काही खास पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2024 12:46 PM2024-11-30T12:46:47+5:302024-11-30T12:52:23+5:30

Peanut Ladoo Recipe : Shengdana Ladoo : Peanut Ladoo Recipe Healthy & Tasty No Sugar Laddu : Shengdana Laddu Quick Energy Booster For Winter Season : थंडीच्या दिवसांत सारखी भूक लागते यासाठी खावेत असे काही खास पदार्थ...

Peanut Ladoo Recipe Shengdana Ladoo Peanut Ladoo Recipe Healthy & Tasty No Sugar Laddu Shengdana Laddu Quick Energy Booster For Winter Season | गूळ शेंगदाणे आहेत ना घरात, मग ' असा ' करा हिवाळ्यातील सुपरफूड खाऊ, पौष्टिक आणि स्वस्त भारी...

गूळ शेंगदाणे आहेत ना घरात, मग ' असा ' करा हिवाळ्यातील सुपरफूड खाऊ, पौष्टिक आणि स्वस्त भारी...

हिवाळ्यात आपल्या शरीराला आतून उबदारपणा मिळावा यासाठी उष्ण पदार्थ फार मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात. या उष्ण पदार्थांमध्ये सर्वात आधी आपल्याला आठवतात ते म्हणजे गूळ आणि शेंगदाणे. हिवाळ्याच्या दिवसांत वातावरणातील गारठ्याने आपल्याला बरेचदा खूप भूक लागते. अशावेळी आपल्याला झटपट काहीतरी तोंडात टाकावेसे वाटते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही वाढलेली भूक न मारता वेळीच काहीतरी खाणे आवश्यक असते. अशावेळी  भुक मारणे, काही न खाता उपाशी राहणे चांगले नाही. कारण या दिवसात अन्नाची गरज वाढणे हे अगदी नैसर्गिक आहे. अशामध्ये जर आपण खायला टाळाटाळ करत गेलो, तर मात्र नक्कीच अशक्तपणा येऊ शकतो. म्हणूनच तर दोन जेवणांमधली भुक भागविण्यासाठी हिवाळ्याच्या दिवसात आपण घरच्याघरीच शेंगदाणे आणि गुळापासून तयार केलेले लाडू (Shengdana Ladoo) आणि चिक्की खाऊ शकतो(Peanut Ladoo Recipe).

गुळ आणि शेंगदाण्यांचा वापर करून बनविण्यात आलेली गोड, चवदार शेंगदाणा चिक्की आणि लाडू म्हणजे हिवाळ्यातील सुपरफुड्सचं! हिवाळ्यात टाईमपास म्हणून खाल्ले जाणारे शेंगदाणे (Peanut Ladoo Recipe Healthy & Tasty No Sugar Laddu) चवीप्रमाणेच आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम असतात. शेंगदाण्यामध्ये असे अनेक पौष्टिक घटक असतात. ज्यामुळे ते आरोग्यासाठी थंडीच्या दिवसांत खाणे खूप फायदेशीर ठरते(Shengdana Laddu Quick Energy Booster For Winter Season).

साहित्य :- 

१. शेंगदाणे - २ कप 
२. गूळ - १ + १/२ कप 
३. पाणी - ३/४ कप 
४. सुंठ पावडर - १ टेबलस्पून 
५. साजूक तूप - १ टेबलस्पून 

हिवाळ्यात आवळा खाणं म्हणजे आरोग्यासाठी अमृत, पाहा आवळा खाण्याची ‘ही’ योग्य पद्धत...


पावभाजी पराठा द्या मुलांच्या डब्यात, मुलं म्हणतील आई अजून हवा! चवीला उत्तम आणि पोषणही भरपूर...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी लोखंडाची कढई घेऊन ती गॅसवर ठेवून व्यवस्थित गरम करुन घ्यावी. आता या गरम कढईत शेंगदाणे घालून ते ३ ते ५ मिनिटे कोरडे भाजून घ्यावे. शेंगदाणे कोरडे भाजून घेतल्यानंतर ते एका मोठ्या कॉटनच्या कपड्यावर ओतावेत. आता हे कापड हळुहळु शेंगदाण्यांवर चोळून त्याच्या साली काढून घ्याव्यात. 
२. आता एक मोठी चाळण किंवा पुरी तयार झाल्याच्या जाळीदार झाऱ्याने हे शेंगदाणे चाळून घ्यावेत. यामुळे शेंगदाणे आणि त्याची सालं वेगळी काढली जातील.  

हिवाळ्यात दही विरजताना लक्षात ठेवा ३ गोष्टी, पातळ-पाणचट न होता विकतसारखे घट्ट दही होईल तयार...

३. एका मोठ्या कढईत किसलेला गूळ आणि पाणी घालून त्याचा पाक तयार करुन घ्यावा. पाक तयार होत आला की त्यात चवीनुसार सुंठ पावडर आणि साजूक तूप घालावे. त्यानंतर यातील थोडा पाक बाजूला काढून घेऊन त्याचे लाडू वाळण्या इतपत घट्ट झाला आहे का ते पाक हाताने वळून तपासून घ्यावे, जर या पाकाचा गोळा व्यवस्थित गोलाकार होत असेल तर कढईतील पाकात भाजून घेतलेले शेंगदाणे घालावेत. 
४. आता हाताला थोडेसे साजूक तूप हाताला लावून हे शेंगदाण्याचे लाडू गोलाकार वळून घ्यावेत. यासोबतच, आपण याची चिक्की देखील करु शकता. यासाठी एका स्टीलच्या डिशला थोडेसे तूप पसरवून लावून त्यावर हे शेंगदाण्याचे तयार मिश्रण पसरवून घालावे. व लागेच सुरीच्या मदतीने चौकोनी आकारात वड्या पाडून घ्याव्यात. 

अशाप्रकारे कुडकुडणाऱ्या थंडीत शरीराला उब देणारे गरमागरम शेंगदाण्याचे लाडू व चिक्की खाण्यासाठी तयार आहे.  

हिवाळ्यात शेंगदाणा लाडू - चिक्की खाण्याचे फायदे... 

१. झिंक आणि मॅग्नेशियम हे दोन्ही घटक शेंगदाणा चिक्कीतून मोठ्या प्रमाणात मिळतात. यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
२.  शेंगदाणा चिक्कीमध्ये असणारे मोनो सॅचुरेटेड फॅटी ॲसिड कोलेस्टरॉल लेव्हल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे चिक्की खाल्ल्यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो. 
३. शेंगदाणा चिक्कीतून आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई मिळतं. त्यामुळे त्वचा चांगली ठेवण्यासाठीही शेंगदाणा चिक्कीचा उपयोग होतो.

Web Title: Peanut Ladoo Recipe Shengdana Ladoo Peanut Ladoo Recipe Healthy & Tasty No Sugar Laddu Shengdana Laddu Quick Energy Booster For Winter Season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.