Join us  

२ कांदे - मुठभर शेंगदाण्याची करा चवदार चटणी, चव अशी की भाजी खायला विसराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2023 1:43 PM

Peanut Onion Chutney | Maharashtrian style Recipe रोज तिच - तिच भाजी खाऊन कंटाळा आलाय? कांदा - शेंगदाण्याची करा चमचमीत चटणी

रोजच्या जेवणाच्या ताटात जर लोणचं, पापड आणि चटणी असेल तर नक्कीच, जेवणाची रंगत वाढते. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या चटण्या करण्यात येतात. काही चटण्या ओल्या असतात तर काही सुक्या. दोन्ही प्रकारच्या चटण्या चवीला अप्रतिम लागतात. त्यातीलच एक चटणी म्हणजे कांदा - शेंगदाण्याची चटणी. ही चटणी कमी साहित्यात कमी वेळात तयार होते.

विशेष म्हणजे जर चपाती किंवा भाकरीसोबत भाजी खायला नसेल, तर आपण या चटणीसोबत देखील खाऊ शकता. शेंगदाण्याच्या कुरकुरीत ट्विस्टसोबत कांदा व मसाल्यांचा तडका या चटणीला स्पेशल करते. चला तर मग घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून, ही चटणी ट्राय करूया. व जेवणाची रंगत वाढवूया(Peanut Onion Chutney | Maharashtrian style Recipe).

कांदा - शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य

शेंगदाण्याचं कूट

कांदा

जिरं

लसूण

आंबट - गोड चवीचं करा थंडगार कोकम सरबत, कमी वेळात - झटपट सरबत रेडी..

हळद

कडीपत्ता

लाल तिखट

मीठ

कृती

सर्वप्रथम, कढईमध्ये  २ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात १ टेबलस्पून जिरं, बारीक चिरलेला लसूण, व २ मोठे बारीक चिरलेला कांदा घालून मिश्रण परतवून घ्या. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. कांद्याला लालसर रंग आल्यानंतर त्यात कडीपत्ता, हळद, २ टेबलस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगलं मिक्स करा.

कुकरच्या एक शिट्टीमध्ये करा मोत्याच्या दाण्यासारखा नायलॉन साबुदाणा, वर्षभर टिकतील, दुप्पट फुलतील

मिश्रण परतवून झाल्यानंतर त्यात शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे. शेंगदाण्याला आधी भाजून घेतल्यानंतर त्याचा कूट तयार करा. जेणेकरून चटणीमध्ये शेंगदाणे क्रिस्पी लागतील. व लो फ्लेमवर हे मिश्रण ५ मिनिटांसाठी परतवून घ्या. अशा प्रकारे कांदा - शेंगदाण्याची चमचमीत क्रिस्पी चटणी खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स