Join us  

फक्त १ कांदा अन् मुठभर शेंगदाणे वापरुन करा चवदार चटणी; अस्सल गावरान ठसका रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 12:54 PM

peanut onion chutney : ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी  भाजून सालं काढलेले शेंगदाणे, लसूण, मिरची  हे ३ पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घ्या

रोजच्या जेवणात लोणचं, चटण्यांची भर पडली तर जेवणाची मजाच काही वेगळी असते. साधं जेवणही रुचकर चविष्ट लागतं. शेंगदाणे, लसूण, मिरची हे पदार्थ सर्वांच्याच घरी असतात. (peanut onion chutney) शेंगदाण्याची सुकी चटणी, शेंगदाणा लसूण आणि लाल मिरचीची ओली चटणी तुम्ही अनेकदा ट्राय केली असेल.  घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून वेगळ्या पद्धतीची चविष्ट चटणी बनवण्याची रेसेपी या लेखात पाहूया. (How to make shendana chutney) 

कृती

१) ही चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी  भाजून सालं काढलेले शेंगदाणे, लसूण, मिरची  हे ३ पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घ्या

२) एक कढईमध्ये तेल गरम करून त्यात  कांदा परतवून घ्या. कांदा गुलाबी झाल्यानंतर त्यात वाटलेलं मिश्रण घाला. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घाला. 

३) या  मिश्रणात थोडं पाणी आणि लिंबाचा रस शिंपडा. त्यानंतर झाकण  ठेवून २ ते ५ मिनिट शिजवून  घ्या.

४) त्यानंतर गॅस बंद करून ही चटणी भाकरी किंवा चपातीबरोबर सर्व्ह करा. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न