शेंगदाण्याचा वापर आपण अनेक पदार्थात करतो. शेंगदाणे कच्चे, वाफवलेले, भाजलेले, खारट, किंवा साधे खायला देखील उत्कृष्ट लागतात. शेंगदाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. शेंगदाण्यांमध्ये असलेल्या पोषक गुणधर्मांमुळे त्याला "गरीबांचे बदाम" असे देखील म्हणतात. कारण याच्या सेवनाने शरीराला बदामासारखेच फायदे मिळतात.
शेंगदाण्यात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, नियासिन, रिबोफ्लेविन, थायमिन, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 9 आणि पॅन्टोथेनिक ॲसिड असतं. ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. पण काहींना शेंगदाण्याचे साल खायला आवडत नाही. शेंगदाण्याचे साल सहसा लवकर निघत नाही. शेंगदाणा झटपट सोलायचे असेल तर, एक ट्रिक फॉलो करा. शेंगदाणा सोलण्याची ही झटपट ट्रिक शेफ रणवीर ब्रारने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे(Peanut peel is not easily removed, this 1 simple trick of Chef Ranbir Brar will work, try it).
गावरान पद्धतीने करा लाल तिखट घालून चमचमीत पिठलं, चव अशी की येईल गावकडची आठवण
शेंगदाणे सोलण्याची सोपी पद्धत
कच्चे शेंगदाणे असो किंवा भाजलेले, काही लोकं शेंगदाण्याचे साल काढून खाणे पसंत करतात. शेंगदाणे सोलण्यासाठी आपण ही ट्रिक वापरून पाहू शकता. यासाठी सर्वप्रथम, एका पातेल्यात शेंगदाणे हलके भाजून घ्या. आता एक कापड घ्या. या कपड्यात शेंगदाणे घेऊन कापड सर्व बाजूंनी बंद करा. एका हाताने घट्ट पकडून त्यावर दाब देताना दुसऱ्या हाताने शेंगदाण्याचे साल काढण्याचा प्रयत्न करा.
१ कप साबुदाणा - १ बटाटा, करा एकादशी स्पेशल साबुदाणा नगेट्स - साबुदाणा न भिजवता झटपट प्रकार
शेंगदाणे जर गरम असतील तर, त्याचे साल झटपट निघतील. जर साल लवकर निघत नसतील तर, आपण त्यात मीठ मिक्स करू शकता. आता शेंगदाणे एका ताटात घ्या, फुक मारून साल आणि शेंगदाणे वेगळे करा. अशा प्रकारे झटपट शेंगदाण्यातून साल वेगळे होईल.