Lokmat Sakhi >Food > डाळींब-शेंगदाण्याची भारी कोशिंबीर! पोटभर खाता येईल अशी चटपटीत चविष्ट भेळच, वजनवाढही टाळा

डाळींब-शेंगदाण्याची भारी कोशिंबीर! पोटभर खाता येईल अशी चटपटीत चविष्ट भेळच, वजनवाढही टाळा

Special breakfast for weight loss: नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहासोबत काहीतरी हेल्दी पण तेवढंच चटपटीत स्नॅक्स खावं वाटत असेल तर ही बघा एक मस्त रेसिपी (food and recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2022 02:08 PM2022-09-17T14:08:24+5:302022-09-17T14:09:00+5:30

Special breakfast for weight loss: नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी चहासोबत काहीतरी हेल्दी पण तेवढंच चटपटीत स्नॅक्स खावं वाटत असेल तर ही बघा एक मस्त रेसिपी (food and recipe)

Peanut- pomegranate Chaat, Healthy snacks recipe in just 10 minutes, Special breakfast for weight loss | डाळींब-शेंगदाण्याची भारी कोशिंबीर! पोटभर खाता येईल अशी चटपटीत चविष्ट भेळच, वजनवाढही टाळा

डाळींब-शेंगदाण्याची भारी कोशिंबीर! पोटभर खाता येईल अशी चटपटीत चविष्ट भेळच, वजनवाढही टाळा

Highlightsनाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहासोबत आपले नेहमीचे तेच ते पदार्थ करण्याऐवजी हा वेगळा पदार्थ ट्राय करून बघा

हेल्थ कॉन्शस झाल्याने आजकाल बरेच जण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत असतात. अशा लोकांना तेल- तूप- साखर नसलेलं काही तरी हेल्दी (healthy snacks for weight loss) खायचं असतं. पण ते हेल्दी खाणं तेवढंच चटपटीत असावं, अशीही त्यांची इच्छा असते. म्हणूनच अशा लोकांसाठी ही एक मस्त रेसिपी आहे. पीनट- पोमोग्रेनेट चाट (Peanut- pomegranate Chaat in just 10 minutes) हा पदार्थ मुळातच एवढा चवदार आहे की लहान मुलांना किंवा घरातल्या इतर व्यक्तींनाही आवडू शकतो. नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या चहासोबत आपले नेहमीचे तेच ते पदार्थ करण्याऐवजी हा वेगळा पदार्थ ट्राय करून बघा (food and recipe). घरातले सगळेच आवडीने खातील.

 

या पदार्थाची रेसिपी इन्स्टाग्रामच्या shecooks.healthy या पेजवर शेअर करण्यात आली आहे. नावातच असल्याप्रमाणे शेंगदाणे आणि डाळींब हे या रेसिपीतील २ महत्त्वाचे पदार्थ. या रेसिपीमध्ये सांगितलेल्या प्रमाणानुसार जर साहित्य घेतलं तर ते ३ जणांसाठी पुरेसं ठरतं. साधारण एक वाटीभर पीनट- पोमोग्रेनेट चाट खाल्ल्यास त्यातून २३० कॅलरीज, ६.७ फॅट्स, २५ कार्ब्स आणि १०. ६ प्रोटीन्स मिळतील, असं या पोस्टमध्ये सांगितलं आहे.

 

पीनट पोमोग्रेनेट चाट रेसिपी
साहित्य

पाऊण कप भाजलेले शेंगदाणे, एक चतुर्थांश कप डाळिंबाचे दाणे, अर्धा कप चिरलेली काकडी, १ लहान आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, १ टीस्पून चाट मसाला, १/३ टीस्पून काळं मीठ, १/३ लाल तिखट, अर्ध्या लिंबाचा रस, पुदिन्याची ५ ते ६ ताजी पाने, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दिड ते दोन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा.

पावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घ्या खास रेसिपी - ५ सोप्या टिप्स - इडल्या होतील हलक्या - स्पोंजी
रेसिपी
१. हे सगळं साहित्य एका मोठ्या बाऊलमध्ये एकत्र करा. व्यवस्थित हलवून घ्या आणि लगेच हा चाट सर्व्ह करा.

२. हा चाट करून ठेवून खूप वेळाने खाऊ नये. लगेचच्या लगेच खाऊन संपवून टाकावा.

३. यात तुम्ही तुमच्या आवडीच्या कच्च्या भाज्याही टाकू शकता. 

 

 

Web Title: Peanut- pomegranate Chaat, Healthy snacks recipe in just 10 minutes, Special breakfast for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.