Join us

काकडी सालांसह खावी की सालं काढून टाकलेलीच बरी? पाहा काकडी खाण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 10:35 IST

Best way to eat cucumber: अनेकदा लोक याबाबत कन्फ्यूज असतात की, काकडी सालीसोबत खावी की साल काढून? काकडी खाण्याची योग्य पद्धत काय? असाही प्रश्न अनेकांना पडतो. अशात याचं उत्तर जाणून घेऊया. 

Best way to eat cucumber: खासकरून उन्हाळ्यात जास्तीत जास्त लोक काकडी खातात. कारण काकडीमध्ये भरपूर पाणी असतं. काकडी सलादचा महत्वाचा भाग असते. तसेच यात अनेक पोषक तत्वही असतात. जे शरीरासाठी चांगले असतात. काकडी वजन कमी करण्यासाठी, त्वचेसाठी आणि पोटासाठी खूप फायदेशीर मानली जाते. पण अनेकदा लोक याबाबत कन्फ्यूज असतात की, काकडी सालीसोबत खावी की साल काढून? काकडी खाण्याची योग्य पद्धत काय? असाही प्रश्न अनेकांना पडतो. अशात याचं उत्तर जाणून घेऊया. 

काकडीमधील पोषक तत्व

एका रिपोर्टनुसार, सालीसोबत खाल्लेल्या एका काकडीमध्ये कॅलरी 45, फॅट  0.3 ग्रॅम, कार्बोहायड्रेट्स 11 ग्रॅम, प्रोटीन 2 ग्रॅम, फायबर 1.5 ग्रॅम, व्हिटॅमिन C 8 ग्रॅम, व्हिटॅमिन K 49 मायक्रोग्रॅम, मॅग्नेशिअम 39 मायक्रोग्रॅम, पोटॅशिअम 442 मिलीग्रॅम असतं. यांशिवाय काकडी जवळपास 96 टक्के पाण्यापासून बनते. ज्यामुळे काकडी हायड्रेशनसाठी खूप चांगली असते.

सालीसोबत काकडी खाण्याचे फायदे

काकडीमध्ये भरपूर प्रमाणात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे शरीराचं फ्री रॅडिकल्सपासून होणारं नुकसान टाळलं जातं. तसेच काकडीमध्ये फ्लेवोनॉयड्स आणि टॅनिन्ससारखे अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. 

लठ्ठपणा होईल कमी

वजन कमी करणाऱ्या लोकांना नियमितपणे काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात कॅलरी कमी असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. तसेच यात फायबरही भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे ओव्हरईटिंग टाळलं जातं.

पचनक्रिया चांगली होते

काकडीमध्ये फायबर आणि पाणी असतं. या दोन्ही गोष्टी पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत करतात. पोट जर लवकर साफ होत नसेल तर यासाठीही काकडी फायदेशीर ठरते. 

काकडी सालीसोबत खावी की सोलून?

अनेक एक्सपर्ट सांगतात की, काकडी सालीसोबतच खाणं अधिक फायदेशीर असतं. कारण काकडीच्या सालीमध्ये अधिक फायबर असतं. अशात जर तुम्ही काकडी साल काढली तर हे महत्वाचं पोषक तत्व तुम्हाला मिळणार नाही. फायबर हे शरीराला अनेक फायदे देणारं तत्व आहे. त्यामुळे काकडी कधीही सोलून खाऊ नका. 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स