Lokmat Sakhi >Food > तेलाच्या बाटलीची कॅप काढून फेकून देता ? इतके दिवस आपले चुकले 'असे ' वाटेल, पाहा कॅपचा उपयोग...

तेलाच्या बाटलीची कॅप काढून फेकून देता ? इतके दिवस आपले चुकले 'असे ' वाटेल, पाहा कॅपचा उपयोग...

Plastic pull tabs on the oil bottles, this is how you should use them : तेलाची बाटली बाजारातून विकत आणली, त्याचे तोंड फारच मोठे असल्याने तेल भसकन पडते, वापरा एक सोपा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 02:32 PM2023-07-26T14:32:23+5:302023-07-26T14:48:07+5:30

Plastic pull tabs on the oil bottles, this is how you should use them : तेलाची बाटली बाजारातून विकत आणली, त्याचे तोंड फारच मोठे असल्याने तेल भसकन पडते, वापरा एक सोपा उपाय...

People shocked after learning what plastic pull tab on oil bottle lids is for. | तेलाच्या बाटलीची कॅप काढून फेकून देता ? इतके दिवस आपले चुकले 'असे ' वाटेल, पाहा कॅपचा उपयोग...

तेलाच्या बाटलीची कॅप काढून फेकून देता ? इतके दिवस आपले चुकले 'असे ' वाटेल, पाहा कॅपचा उपयोग...

तेल हा आपल्या रोजच्या जेवणातला अतिशय महत्वाचा पदार्थ आहे. कोणताही पदार्थ बनवायचा म्हटलं की तेल हे आवश्यक आहे. परंतु बदलत्या काळानुसार सगळेच आपल्या आरोग्याची अतिशय काळजी घेताना दिसून येतात. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आपण कमीत कमी तेल वापरण्याचा प्रयत्न करतो. यासाठी आपण काहीवेळा रोजच्या स्वयंपाकासाठी वापरात येणारे तेल आरोग्यासाठी चांगले आहे की नाही हे तापसूनच घेतो. 

आजकाल आरोग्याच्या दृष्टीने घाण्यावरचे तेल, शुद्ध १००% असणारे तेल, किंवा कोल्ड प्रेस तेल यांसारख्या वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. आपण रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारे तेल बाहेरून एकदमच विकत आणतो. हे तेल विकत घेतल्यानंतर ते एखाद्या मोठ्या कॅनमध्ये किंवा बाटलीमध्ये पॅक करून येते. हे तेल वापरण्यासाठी आपण काहीवेळा ते एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवतो किंवा त्याच बाटलीत ते ठेवतो. काहीवेळा घाई गडबडीत स्वयंपाक करताना आपल्या हातून हे तेल अधिकच ओतले जाते. तर कित्येकदा या तेलाच्या बाटल्यांचे तोंड हे थोडे मोठे असते, यामुळे तेल ओतताना ते अधिकचे ओतले जाते. असे होऊ नये म्हणून आपण एक सोपी ट्रिक वापरुन पदार्थांत अधिक तेल पडण्यापासून वाचवू शकतो(People shocked after learning what plastic pull tab on oil bottle lids is for).

नेमकी काय आहे ही सोपी ट्रिक... 

१. आपण जेव्हा बाजारांतून तेलाची बाटली विकत आणतो तेव्हा त्या बाटलीचे झाकण उघडल्यानंतर त्या बाटलीच्या आतील तेल हे सील करुन पॅकिंग केलेलं असते.  

२. या बाटलीचे झाकण उघडल्यानंतर त्याच्या आत एक छोटीशी गोल कॅप असते. 

किचनच्या भिंतीवरचे तेलाचे मेणचट चिकट डाग काढण्यासाठी ४ सोपे उपाय, भिंत दिसेल स्वच्छ-चकचकीत...

पावसाळ्यात घराचे खिडक्या - दरवाजे फुगून झाले आहेत जाम ? ६ सोपे घरगुती उपाय...

३. ही कॅप हाताने खेचून उघडल्यानंतर, ती कॅप उलटी करुन परत त्या बाटलीच्या तोंडाशी बसवावी. 

सतत पडणाऱ्या पावसामुळे गाडीच्या काचा, आरसे यातून धुरकट दिसते ? १ सोपा उपाय...

पावसाळी नव्या - कोऱ्या चपलांमुळे शु बाईट होते ? ७ सोपे उपाय, शु बाईट पासून मिळेल मुक्ती...

४. असे केल्याने बाटलीतून तेल ओतताना ते अधिक प्रमाणात पडण्याची समस्या कायमची दूर होते. 

५. आपण तेलाच्या बाटलीच्या तोंडाशी असणारी ही छोटीशी उपयुक्त कॅप, वापराची नाही असे समजून फेकून देतो. परंतु या छोट्याशा कॅपचा हा खरा उपयोग समजून घ्या व त्याचा वापर करा.

Web Title: People shocked after learning what plastic pull tab on oil bottle lids is for.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.