Join us  

कोण म्हणते अनारसा करणे कठीण काम? ही घ्या झटपट अनारसे करण्याची कृती, खा जाळीदार अनारसे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2024 4:54 PM

Perfect Anarasa at home : Easy Way to Make Anarsa Crispy Mesh that Melts on the Tongue Not in Oil : Diwali special Anarsa Recipe : 10 Min. Instant Anarsa Recipe : अनारसे करण्यासाठी खूप मोठा घाट ना घालता अगदी पटकन तयार होणाऱ्या इन्स्टंट अनारशाची सोपी रेसिपी...

दिवाळी (Diwali 2024) फराळाच्या पदार्थांमधील सगळ्यांच्याच आवडीचा एक पदार्थ म्हणजे अनारसा. मस्त गोड चवीचा, सुंदर, नाजूक जाळीदार, कुरकुरीत अनारसा खाणे याहून मोठे सुख नाही. अनारसा टेस्टला अतिशय उत्तम लागत असला तरीही तो तयार करण्यासाठी खूप मोठा घाट घालावा लागतो. अनारसा करण्यासाठीचा  एवढा घाट घातल्यानंतरही काहीवेळा हे अनारसे फसतात. अनारसे बनवणं हे अत्यंत नाजूक काम आहे ते अत्यंत बारकाईने करणे महत्वाचे असते. अनेकदा कितीही काळजी घेऊन देखील हे अनारसे बिघडतात(10 Min. Instant Anarsa Recipe).

अगदी परफेक्ट 'अनारसा' तयार करण्यासाठी फराळाच्या इतर पदार्थांपेक्षा थोडी जास्तीची मेहेनत घ्यावी लागते. खरंतर जुन्या पारंपरिक पद्धतीने अनारसा तयार करायचा म्हटलं तर तांदूळ भिजत ठेवून आधी अनारशाचे पीठ तयार केले जाते, त्यानंतर या पिठाचे अनारसे तयार केले जातात. परंतु या पारंपरिक पद्धतीने अनारसा तयार करण्याच्या रेसिपीला फारच वेळ लागतो. याचसोबत खूप मेहेनत आणि फार मोठा घाट घालावा लागतो. परंतु सध्या इंस्टंटन्टचा जमाना असल्याने इतकी मेहेनत करण्यासाठी पुरेसा वेळ (Easy Way to Make Anarsa Crispy Mesh that Melts on the Tongue Not in Oil ) शक्यतो नसतोच. अशा परिस्थितीत, आपण एकतर रेडिमेड पीठ आणून त्याचे अनारसे करतो किंवा तयार अनारसेच विकत आणतो. परंतु यंदाच्या दिवाळीला ही इंस्टंट अनारशाची सोपी रेसिपी नक्की ट्राय करुन पहा. ही रेसिपी फॉलो करुन आपण अगदी तासाभरातच झटपट अनारसे तयार करु शकता. इंस्टंट अनारसे तयार करण्याची पद्धत ही थोड्या फार प्रमाणात सारखीच असली तरी वेळखाऊ नाही. यामुळे दिवाळीतच नाही तर तुम्ही इतर वेळीही असे खुसखुशीत अनारसे बनवून त्याचा आनंद घेऊ शकता(Diwali special Anarsa Recipe).

साहित्य :- 

१. तांदुळाचे पीठ - २ कप २. गूळ - १, १/२ कप ३. केळी - ५ ते ६ तुकडे ४. दूध - ८ ते १० चमचे ५. तेल - तळण्यासाठी ६. खसखस - ३ ते ४ टेबसलस्पून

मुलांच्या डब्यांत देण्यासाठी पौष्टिक पराठ्यांचे ८ नवीन प्रकार, रोज नवीन हेल्दी खाऊ...

केशर पदार्थात घालताना तुम्हीही हमखास करताय ‘ही’ चूक, महागडं केशर वापरुनही रंग-स्वाद गायब कारण...

कृती :- 

१. एका मिक्सरच्या भांड्यात तांदुळाचे पीठ घेऊन त्यात गूळ व केळ्याचे काप घालावेत. आता मिक्सर फिरवून हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यावेत. २. आता हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावे. ३. मिक्सरमधून वाटून घेतलेल्या मिश्रणात गरजेनुसार थोडेसे दूध घालून पीठ मळून घ्यावे.  

फराळ करण्यापूर्वी करून ठेवा १० गोष्टी, फराळ बिघडणे-तेल सांडणे आणि रात्रभर जागरण टळेल...

४. आता या मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून ते थोडेसे तेल लावून थापून घ्यावे. ५. अनारसे थापून झाल्यानंतर ते खसखस मध्ये घोळवून घ्यावेत. ६. आता गॅसवर एका कढईत तेल ठेवून या गरम तेलात अनारसे सोडून दोन्ही बाजुंनी खरपूस गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यावे. 

झटपट तयार होणारे इन्स्टंट अनारसे खाण्यासाठी तयार आहेत.

टॅग्स :दिवाळी 2024अन्नदिवाळीतील पूजा विधीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती