Lokmat Sakhi >Food > दिवाळीसाठी यंदा घरीच करा बाकरवडी, झटपट रेसिपी - फराळाचा करा खास वेगळा खुसखुशीत पदार्थ...

दिवाळीसाठी यंदा घरीच करा बाकरवडी, झटपट रेसिपी - फराळाचा करा खास वेगळा खुसखुशीत पदार्थ...

Diwali Faral Special Recipe : Perfect Bakarwadi Recipe : मार्केटसारखी छान मसालेदार, चटपटीत बाकरवडी घरच्या घरीच बनवण्याची सोपी रेसिपी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 12:52 PM2023-10-31T12:52:24+5:302023-11-02T08:35:37+5:30

Diwali Faral Special Recipe : Perfect Bakarwadi Recipe : मार्केटसारखी छान मसालेदार, चटपटीत बाकरवडी घरच्या घरीच बनवण्याची सोपी रेसिपी....

Perfect Bakarwadi Recipe, how to make maharashtrian bhakarwadi snack, Bhakarwadi Recipe | दिवाळीसाठी यंदा घरीच करा बाकरवडी, झटपट रेसिपी - फराळाचा करा खास वेगळा खुसखुशीत पदार्थ...

दिवाळीसाठी यंदा घरीच करा बाकरवडी, झटपट रेसिपी - फराळाचा करा खास वेगळा खुसखुशीत पदार्थ...

दिवाळी सण हा सर्वांच्याच आवडीचा सण. हा सण काही दिवसांवर आलाय. दिवाळीचा फराळ हा शक्यतो अजूनही बरेचसे लोक घरीच बनवणे पसंत करतात. लाडू, चकली, चिवडा, शंकपाळे, अनारसे, बाकरवडी, करंजी असे सर्व फराळाचे पदार्थ घरीच बनवले जातात. जसजशी दिवाळी जवळ येते तसे घरातील गृहिणींची दिवाळीसाठी फराळ करण्याची तयारी सुरु होते. सध्या प्रत्येक घरात फराळाची तयारी करण्याची लगबग एव्हाना सुरु झाली असेल. दिवाळीपूर्वीचे आठ ते दहा दिवस हे फराळ व दिवाळीची तयारी करण्यातच जातात(Bhakarwadi Recipe).

दिवाळीच्या फराळांमधील गोड, तिखट अशा दोन्ही चवीचे पदार्थ आपण (Crispy Bakarwadi, Tips & Tricks for Perfect Bakarwadi) आवडीने खातो. चकली, चिवडा, शेव, बाकरवडी (Bhakarwadi recipe, diwali special faral) यांसारख्या तिखट पदार्थांवर ताव मारला जातो. यातील बाकरवडी ही अतिशय आवडीने व चवीने खाल्ली जाते. एरवी वर्षभर आपण दुकानात विकत मिळणारी बाकरवडी खातोच. परंतु दिवाळीच्या खास सणासाठी फराळाच्या ताटात खमंग, खुसखुशीत मसालेदार बाकरवडी नसली तर फराळाचे ताट अधुरे वाटते. यासाठीच यंदाच्या दिवाळीत स्पेशल विकत सारखी बाकरवडी घरी बनवण्यासाठीची सोपी रेसिपी( how to make maharashtrian bhakarwadi snack).

साहित्य :- 

१. मैदा - १ + १/२ कप 
२. बेसन - १/४ कप 
३. तेल - ३ ते ४ टेबलस्पून 
४. ओवा - १/२ टेबलस्पून 
५. मीठ - चवीनुसार 
६. जिरे - २ टेबलस्पून 
७. धणे - २ टेबलस्पून 
८. बडीशेप - ३ टेबलस्पून 
९. तीळ - ३ टेबलस्पून 
१०. किसलेल सुक खोबर - १/२ कप 
११. साखर - ३ ते ४ टेबलस्पून 
१२. लाल तिखट मसाला - ३ टेबलस्पून 
१३. गरम मसाला - २ टेबलस्पून 
१४. आमचूर पावडर - १ + १/२ टेबलस्पून 
१५. चिंच - २ टेबलस्पून 
१६. गूळ - २ टेबलस्पून 
१७. हळद - १/२ टेबलस्पून 
१८. हिंग - १/२ टेबलस्पून 
१९. पांढरे तीळ - १ टेबलस्पून

दिवाळीच्या सुटीत मुलं म्हणणारच आई आज काय स्पेशल ? पालक - मेथी पुऱ्यांची घ्या झटपट रेसिपी-खुसखुशीत खाऊ...

ना बटाटे उकडण्याची गरज - ना सारणाची भानगड, फक्त १० मिनिटांत करा गरमागरम आलू पराठे...

कृती :- 

१. एका मोठ्या परातीमध्ये मैदा, बेसन, तेल, मीठ, ओवा घालून घ्यावा. आता या पिठात गरजेनुसार थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. 
२. पीठ मळून घेतल्यानंतर ते पीठ थोडावेळ तसेच ठेवून द्यावे. 
३. आता एक कढई घेऊन त्यात जिरे, धणे, बडीशेप, पांढरे तीळ, सुकं खोबर घालून हे सगळे जिन्नस कोरडे भाजून घ्यावेत. 
४. हे भाजून घेतलेले जिन्नस थोडे गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात साखर, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, हिंग, आमचूर पावडर, मीठ घालून हे सगळे जिन्नस मिक्सरला लावून बारीक वाटून त्याचा मसाला तयार करुन घ्यावा. 
५. चिंचेचा कोळ व गूळ एकत्रित करून त्याची पातळ पेस्ट बनवून घ्यावी. 

यंदा गुलाबी थंडीत करा मसालेदार खट्टामिठा पेरु चाट, तोंडाला पाणी सुटेल - घ्या झटपट रेसिपी...

हरबरे उकडलेले उरलेले पाणी फेकून देता ? ‘असा’ करा वापर, प्रोटीनचा खजिना - सुधारेल तब्येत...

६. आता मळून ठेवलेल्या पिठाची एक मोठी गोलाकार मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यावी. 
७. या लाटलेल्या पिठाच्या पारीवार चिंच - गुळाची पेस्ट लावून ती व्यवस्थित सर्वत्र पसरवून घ्यावी. 
८. त्यानंतर त्यावर मिक्सरमध्ये वाटून घेतलेला मसाला सगळीकडे पसरवून घालावा. मसाला घातल्यानंतर त्यावर हलकेच लाटणं फिरवून तो मसाला पारीवार सेट करून घ्यावा.  
९. आता या पारीचा गोल गोल करून छान रोल करून घ्यावा. मग या तयार रोलचे छोटे छोटे तुकडे कापून घ्यावेत. 
१०. हे बाकरवडीचे लहान तुकडे तेलात सोडून दोन्ही बाजुंनी खरपूस, खमंग तळून घ्यावेत. 

आपली खमंग, खुसखुशीत, मसालेदार बाकरवडी खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Perfect Bakarwadi Recipe, how to make maharashtrian bhakarwadi snack, Bhakarwadi Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.