Lokmat Sakhi >Food > परफेक्ट ढाबास्टाइल भटूरे घरी करा, ८ टिप्स-भटूरे फुलतील फुग्यासारखे टम्म! दिल खुश हो जाएगा...

परफेक्ट ढाबास्टाइल भटूरे घरी करा, ८ टिप्स-भटूरे फुलतील फुग्यासारखे टम्म! दिल खुश हो जाएगा...

Perfect fluffy Bhatura : how to make street style bhature at home : How to Make Best Bhatura Dhaba Style at Home : तेल न पिणारे, खुसखुशीत ढाबा स्टाईल भटुरे घरीच करण्यासाठी खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 07:31 AM2024-10-16T07:31:28+5:302024-10-16T07:49:32+5:30

Perfect fluffy Bhatura : how to make street style bhature at home : How to Make Best Bhatura Dhaba Style at Home : तेल न पिणारे, खुसखुशीत ढाबा स्टाईल भटुरे घरीच करण्यासाठी खास टिप्स...

Perfect fluffy Bhatura how to make street style bhature at home How to Make Best Bhatura Dhaba Style at Home | परफेक्ट ढाबास्टाइल भटूरे घरी करा, ८ टिप्स-भटूरे फुलतील फुग्यासारखे टम्म! दिल खुश हो जाएगा...

परफेक्ट ढाबास्टाइल भटूरे घरी करा, ८ टिप्स-भटूरे फुलतील फुग्यासारखे टम्म! दिल खुश हो जाएगा...

आपण बऱ्याचदा कोणत्याही रोड साईड ढाब्यावर गेलो की छोले - भटुरे हमखास ऑर्डर करतो. छोले - भटुरे ही उत्तर भारतातील एक प्रसिद्ध डिश आहे.  आजकाल प्रत्येक हॉटेल, रेस्टोरंट आणि ढाब्यावर छोले - भटुरे सहज मिळतात. भारतात ठिकठिकाणी असणारे ढाबे, हॉटेल्स, रेस्टोरंटमध्ये पंजाबी डिश म्हणून छोले - भटुरे अतिशय लोकप्रिय आहे. छोले म्हणजे काबुली चणे एका विशिष्ट पद्धतीने बनवले जातात आणि त्याबरोबर खाण्यासाठी मैदा – बटाटा एकत्र करून बनवलेल्या पुऱ्या म्हणजेच भटुरे दिले जातात( Perfect fluffy Bhatura recipe).

छोले - भटुरे (street style chole bhature recipe) हे कांदा, टोमॅटो किंवा काकडी कापून या सॅलडसोबत मस्त सर्व्ह केले जातात. हे ढाबा स्टाईल छोले - भटुरे आपण घरी सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो. छोले तर बनतात परंतु कितीही प्रयत्न करूनही ढाबा स्टाईल भटुरे (Bhatura Recipe, How to Make Bhature) बनवू शकत नाही. घरी मात्र भटुरे बनवताना ते ढाब्यांवर मिळतात तशा चवीचे  बनत नाहीत, तेलात नीट फुगत नाहीत, जास्तीचे तेल पितात, ढाब्यांवर मिळतात तसेच होत नाहीत अशी बऱ्याच जणांची तक्रार असते. तेव्हा घरच्या घरी भटुरे बनविण्यासाठी काही खास टीप्स लक्षात ठेवूयात(Bhatura Recipe : How to Make Best Bhatura Dhaba Style at Home).

ढाबा स्टाईल परफेक्ट भटुरे बनवण्यासाठी लक्षात ठेवा - 

१. भटुरे बनवताना तुम्ही त्यात ७ ते ८ ब्रेडचे स्लाइस कुस्करून घालू शकता. असे केल्याने तुम्हाला भटूऱ्याचे पीठ रात्रभर फरमेंटेड करून ठेवण्याची गरज नाही भासणार.   

२. भटूऱ्याचे कणीक मळताना त्यात दही घातल्याने भटुरे मऊसूत बनतात. 

कटलेट्स-पॅटिस क्रिस्पी -कुरकुरीत आणि चविष्ट हाेण्यासाठी ६ उपाय, गार झाल्यावरही मऊ पडणार नाहीत...

३. भटुरे ढाबास्टाईल मऊ आणि कुरकुरीत करण्यासाठी पीठ मळताना त्यात उकडलेला बटाटा, किंवा पनीर कुस्करून घालावे. 

४. भटुरे तळताना तेल व्यवस्थित गरम झाले आहे की नाही हे आधी तपासून पाहा आणि मगच भटुरे तळा. भटुरे तळताना ते दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्या. 

फक्त थेंबभर तेलात तळा पापड! भरपूर तेल नसेल तरी कुरकुरीत पापड तळण्याची नवी युक्ती...

५. भटुरे कुरकुरीत व क्रिस्पी बनविण्यासाठी कणीक मळताना त्यात थोडा रवा घाला.

६. भटुरे तयार करण्यासाठी पीठ मळून झाल्यानंतर ते पीठ प्लॅस्टिकच्या पिशवीत रॅप करून ४ ते ५ तासांसाठी तसेच ठेवून द्यावे, यामुळे भटूऱ्याचे पीठ चांगले फुलून येते. त्याचबरोबर यामुळे भटूऱ्याच्या पिठाला एक प्रकारची लवचिकता येते ज्यामुळे भटुरे अगदी सहज लाटले जातात.  

मुलांच्या डब्यांत देण्यासाठी पौष्टिक पराठ्यांचे ८ नवीन प्रकार, रोज नवीन हेल्दी खाऊ...

७. भटूऱ्याचे पीठ मळताना त्यात थोडी साखर घालावी यामुळे फरमेंटेशनची प्रोसेस अधिक चांगली व जलद गतीने होण्यास मदत मिळते. यासोबतच भटूऱ्याला एक प्रकारची चकाकी आणि त्याचा रंग छान यावा यासाठी साखर फायदेशीर ठरते. 

८. भटूऱ्याचे पीठ जितके जास्त चांगले मळले जाईल तितकेच भटूरे फुलून येण्यास मदत होईल. 


Web Title: Perfect fluffy Bhatura how to make street style bhature at home How to Make Best Bhatura Dhaba Style at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.