इडली (Idli) हा नाश्त्यासाठी खाल्ला जाणारा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. इडली-चटणीचं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं. इडल्या चवीला अत्यंत रूचकर आणि मऊ असतात. इडल्या कडक होतात, हव्या तशा बनत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. इडल्या सॉफ्ट होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवाव्या लागतात. तेव्हाच तुम्ही हॉटेलस्टाईल इडली घरात बनवू शकता. (South Indian Style Idli Recipe) इडली दुपारच्या जेवणाला, सकाळी खाण्यासाठी आणि टिफिनसाठी उत्तम पर्याय आहेत. (How To Make Idli Easy Recipe South Indian Style Idli Making Tips)
इडली बनवण्याची सोपी रेसिपी (How To Make Soft Perfect Idli)
१) इडली करण्यासाठी ३ कप तांदूळ आणि १ कप उडीदाची डाळ वेगवेगळ्या भांड्यात काढून स्वच्छ धुवून घ्या. २ ते ३ वेळा पाण्याने धुतल्यानंतर तांदूळ स्वच्छ होतील. डाळ आणि तांदूळ ४ ते ५ तासांसाठी भिजवायला ठेवा.
२) भिजवल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्या. पाणी काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून तांदूळ वाटून घ्या. त्यानंतर डाळही वाटून घ्या. वाटलेली साहित्य एका पातेलीत घालून हाताने कालवून घ्या. यात तुम्ही मेथीचे भिजवलेले दाणे दळून घालू शकता.
३) इडलीचं तयार पीठ एका बंद डब्यात ठेवून ८ तासांसाठी आंबवण्यासाठी ठेवा. ८ तासांनी पीठ आंबवून फुललेलं दिसून येईल. त्यानंतर एका टोपलीत इडलीचा स्टॅण्ड ठेवून पातळ कापड घालून त्यावर इडलीचं पीठ घाला.
४) १० ते १५ मिनिटं कुकरमध्ये किंवा पातेल्यात वाफेवर इडल्या शिजवून घ्या. नंतर सुरीच्या साहाय्याने इडल्या काढून घा. गरमागरम इडल्या
इडल्या बिघडू नयेत यासाठी टिप्स (Perfec Soft Idli Making Tips)
इडली बनवताना डाळ आणि तांदूळ योग्य प्रमाणात घ्या. तुम्ही एक कप उडीदाच्या डाळीसाठी तीन कप तांदूळ घ्या. इडली तयार करण्यासाठी २ लांब दाण्यांच्या तांदूळाचा वापर करा. इडलीसाठी जाड तांदूळांचा वापर करा. सगळ्यात आधी डाळ वाटून घ्या.
माथ्यावरचे केस जास्तच पांढरे दिसतात? किचनमधल्या ३ वस्तू केसांना लावा; डाय न लावता काळे होतील केस
डाळ वाटल्यानंतर ज्या पाण्यात डाळीला भिजवलं आहे त्याच पाण्याचा वापर करा. तांदूळ वाटल्यानंतर डाळीच्या बॅटरसोबत मिक्स करा. दोन्ही बॅटर व्यवस्थित मिसळण्यासाठी हाताचा वापर करा. इडलीचं स्टॅण्ड काहीवेळासाठी थंड व्हायला ठेवा. त्यानंतर थोड्यावेळानं त्यातून इडली काढून ठेवा.