हिवाळ्यात शरीरात उष्णता टिकून राहण्यासाठी आणि चांगल्या तब्येतीसाठी डिंकाचे, मेथीचे लाडू अनेक घरांमध्ये खाल्ले जातात. (Winter Special Methi Ladoo) पण घरातल्या ४ पैकी २ माणसांना मेथीचे लाडू खाण्यात रस असतो. याच कारण म्हणजे मेथीच्या लाडवांची कडवट चव. मेथीचे लाडू कमालीचे पौष्टीक असले तरी कडूपणामुळे लहान मुलं तर सोडाच पण मोठी माणसंही नाक मुरडतात. (Winter Special Foods) खूप कमी लोकांना मेथीचे लाडू जरा गोड चवीचे आणि परफेक्ट बनवता येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मेथीच्या लाडवांच्या खास रेसेपीज सांगणार आहोत. हे लाडू तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतील तर पण जीभेलाही तितकेच चविष्ट लागतील. (Perfect Methi Ladoo Recipe)
मेथीच्या दाण्याचे फायदे (Methi Ladoo Benefits)
ॲनिमिया कमी करण्यासाठी मेथ्या अत्यंत उपयुक्त ठरतात. यात भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे ज्यांना अपचन, पोट साफ न होणं,एसिडिटी असे त्रास असल्यास त्यांना मेथ्यांच्या सेवनामुळे खूप फायदा होतो. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मेथ्या अत्यंत उपयुक्त ठरतात. नियमित मेथ्या खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यासही मेथ्या उपयुक्त ठरतात. सौंदर्य वाढविण्यासाठीही मेथ्या खाणे फायदेशीर ठरते. मेथ्यांमुळे मुरूमांचा त्रास कमी होतो आणि त्वचा तजेलदार होते. महिलांसाठीही मेथ्या खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे हार्मोनल इम्बॅलेन्स होत नाही.
मेथीच्या लाडूंची रेसेपी
साहित्य
1 किलो गव्हाचं पीठ ,
४५० ग्रॅम तूप,
४५० ग्रॅम गूळ बारीक चिरलेला (चिक्कीचा गूळ विकत घेऊ नये, अन्यथा लाडू तिळाच्या लाडूसारखे चिकट होतात)
२ वाटी किसलेले सुकं खोबरं,
३ कप बारीक केलेलं खारीक,
७-८ वेलचीचे दाणे, २ कप बारीक केलेले बदामाचे तुकडे,
२ कप बारीक केलेले काजूचे तुकडे,
दीड वाटी मनुके,
१ वाटी हालिम,
४ टेबलस्पून खसखस,
४ टेबलस्पून रवा,
२ वाटी डिंक,
२ वाटी मेथीचे दाणे,
दीड ते दोन ग्लास पाणी
कृती
सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये मेथीचे दाणे, हालिम, सुखं खोबरं, खसखस, रवा हलका भाजून घ्या. कढई मध्ये तीन ते चार टेबलस्पून तूप गरम करून करून डिंक सुद्धा भाजून घ्या. ( कोणताही पदार्थ भाजताना किंवा तळताना जळणार नाही याची काळजी घेऊन मंद आचेवर पदार्थ भाजा)
नंतर एका कढईमध्ये उरलेलं सगळं तुप घालून गरम करून घ्या. नंतर त्यामध्ये थोडे थोडे करून गव्हाचे पीठ घालून गव्हाचे पीठ छान ब्राऊन होईपर्यंत आणि खमंग वास येईपर्यंत भाजून घ्या.
मिक्सरमध्ये मेथीचे दाणे, वेलची वाटून घ्या. भाजलेले गव्हाचे पीठ एका परातीत काढा. त्यामध्ये बाकीचे सर्व भाजलेले साहित्य मिक्स करा. यात तुम्ही मनुके, खारीक पावडर, बारीक केलेले ड्रायफुट्स ॲड करा. सर्व साहित्य एकत्रित करून घ्या.
एका भांड्यात दोन ग्लास पाणी गरम करून त्यात गूळ घाला. गुळाचा पाक तयार करून घ्या. नंतर त्यामध्ये एक चमचा तूप घाला. पाकामध्ये तयार एकत्रित मिश्रण घाला. पाकात जितके मावेल तितकेच मिश्रण घाला. चमच्याने ढवळत सगळे मिश्रण पाकात एकजीव करून घ्या.
मिश्रण एका मोठया परातीत काढा. हातानं सगळे मिश्रण छान एकजीव करून घ्या. मिश्रण गरम असतानाच त्याचे छान लाडू वळून घ्या. तयार आहेत मेथीचे लाडू.
1)
2)
3)