गरमागरम चहाचा कप दररोज सकाळी आपल्याला हवाच असतो. काही अपवाद सोडले तर जवळपास सगळ्याच घरांमध्ये दिवसाची सुरुवात चहाचे पातेले गॅसवर चढवूनच होते. सकाळचा एक चहा आणि ४ ते ५ वाजेदरम्यानचा एक चहा असे दोन चहा मिळाले की भारतातली अर्धी जनता तरी नक्कीख खूष होत असेल.. आता अनेक जण आरोग्याविषयी अधिक जागरुक झालेले आहेत. त्यामुळे चहामध्ये साखर घालण्याऐवजी गूळ घालण्याकडे त्यांचा कल असतो (how to make jaggery tea?). पण नेमकं होतं काय की नेहमीच्या साखरेच्या सवयीने आपण चहा करायला जातो आणि चहामध्ये गूळ घालताच तो फाटतो किंवा नासतो (perfect recipe for making gud ki chai).. तुमचंही असंच होत असेल तर गुळाचा चहा करण्याची ही परफेक्ट रेसिपी एकदा पाहून घ्या.(Tips For Preventing Jaggery Tea From Curdling)
गुळाचा चहा नासू नये म्हणून टिप्स
१. गुळाचा चहा करण्यासाठी सगळ्यात आधी एका पातेल्यात तुम्हाला चहामध्ये जेवढे दूध घालायचे असेल तेवढे दूध घ्या आणि ते गॅसवर गरम करायला ठेेवा.
नियमितपणे तेल लावूनही केस गळणं थांबत नाही? नीता अंबानींचे हेअर स्टायलिस्ट सांगतात ५ कारणं
२. आता दुसरीकडे चहा करण्यासाठी तुम्ही जेवढे पाणी घेणार असाल तेवढे घ्या आणि ते दुसऱ्या शेगडीवर गरम करायला ठेवा. आता त्या पाण्यामध्ये चहा मसाला, वेलचीपूड, आलं असं तुम्हाला जे काही घालायचं असेल ते घाला आणि पाणी थोडं गरम करून घ्या.
३. पाणी गरम झालं की त्यामध्ये चहा पावडर आणि गूळ घाला आणि त्या पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊ द्या.
लग्नसराई स्पेशल: मेहेंदी, हळद कार्यक्रमांत घाला पटियाला सूट- करा बॉलीवूड अभिनेत्रींसारखा 'देसी लूक'
४. चहाचं पाणी आणि दूध दोन्ही उकळायला लागले की दोन्ही गॅस बंद करा. यानंतर दूध गाळून चहाच्या पाण्यात घाला. आता चमच्याने सगळं व्यवस्थित हलवून घ्या. आणि गुळाचा गरमागरम चहा गाळून कपमध्ये ओता.
५. गुळाचा चहा करताना नेहमी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की दूध आणि गूळ एकत्र आले की ते आपल्याला अजिबात उकळू द्यायचे नाहीत. त्यामुळे नेहमी गॅस बंद करूनच हे दोन्ही पदार्थ एकत्र करा.