Lokmat Sakhi >Food > गुजराथी खांडवी बनवण्याची परफेक्ट कृती, करायला सोपी आणि खायला मस्त खांडवीची पारंपरिक रेसिपी

गुजराथी खांडवी बनवण्याची परफेक्ट कृती, करायला सोपी आणि खायला मस्त खांडवीची पारंपरिक रेसिपी

How To Make Khandvi In Microwave : Khandvi Recipe : चारचा चहा किंवा सकाळी नाश्त्यालाही करता येईल असा गुजराथी पदार्थ, खांडवीची खास कृती.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 02:23 PM2023-02-15T14:23:25+5:302023-02-15T14:25:48+5:30

How To Make Khandvi In Microwave : Khandvi Recipe : चारचा चहा किंवा सकाळी नाश्त्यालाही करता येईल असा गुजराथी पदार्थ, खांडवीची खास कृती.

Perfect recipe for making Gujarati Khandvi, easy to make and delicious traditional Khandvi recipe | गुजराथी खांडवी बनवण्याची परफेक्ट कृती, करायला सोपी आणि खायला मस्त खांडवीची पारंपरिक रेसिपी

गुजराथी खांडवी बनवण्याची परफेक्ट कृती, करायला सोपी आणि खायला मस्त खांडवीची पारंपरिक रेसिपी

आपण कित्येकदा फरसाण, गाठीया, फाफडा असे गुजराथी नाश्त्याचे प्रकार खरेदी करण्यासाठी दुकानात जातो. दुकानात गेल्यावर आपल्याला खमण ढोकळा, कचोरी, फाफडा, जिलेबी असे अनेक प्रकार समोर दिसतात. याच पदार्थांसारखा दुकानातील काचेच्या कपाटात एका कोपऱ्यात ट्रे मध्ये मांडून ठेवलेला तो पिवळा धम्मक पण दिसायला नाजूक पदार्थ आपले लक्ष वेधून घेतो. गरमागरम बेसन पिठाच्या गोल गोल नाजूक सुरळ्या बनवून एकावर एक रचून ठेवलेल्या असतात. या सुरळ्यांवर मोहरी, मिरची, कढीपत्ता यांची खमंग फोडणी दिली जाते. त्यानंतर त्यावरून ओल किसलेलं खोबर आणि कोथिंबीर भुरभुरली जाते. अश्या बेसनापासून तयार झालेल्या, खमंग फोडणीचा वर्षाव केलेल्या नाजूक सुरळीच्या वडयांना गुजरातीमध्ये 'खांडवी' असे म्हटले जाते.

ही खांडवी खजुराची गोड चटणी आणि हिरव्या मिरचीची तिखट चटणी यासोबत सर्व्ह केली जाते. ही गोल गुंडाळलेली नाजूक खांडवी म्हणजे अनेकांच्या आवडीचा विषय आहे. कधी आपल्याला नाश्त्याला काही वेगळा पण हलका - फुलका पदार्थ खावासा वाटला तर खांडवी हा उत्तम चविष्टय नाश्ता सगळ्यांच्याच तोंडाला पाणी आणेल(How To Make Khandvi In Microwave : Khandvi Recipe).    

साहित्य :- 
१. बेसन - १/२ कप
२. दही - १/२ कप
३. पाणी - १ कप
४. तेल - १ टेबलस्पून 
५. हळद - १/४ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार  

फोडणीसाठी -
१. तेल - २ टेबलस्पून 
२. कढीपत्ता - ७ ते ८ पानं 
३. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ 
४. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
५. ओला नारळ - १ टेबलस्पून (खवून घेतलेला)
६. मोहरी - १/२ टेबलस्पून 

कृती :- 
१. एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन, दही, पाणी, तेल एकत्र करावे. बेसनाच्या गुठळ्या न होता मिश्रण भिजवावे. त्यात हळद आणि मीठ घालावे. सर्व मिश्रण एकदम एकजीव करून घ्यावे.
२.  एका कढई किंवा पॅन मध्ये सर्व मिश्रण घालावे. मध्यम आचेवर मिश्रण शिजेपर्यंत ढवळत राहावे, (जर ढवळायचे थांबवले तर गुठळ्या होण्याची शक्यता असते).
३. मिश्रण दाटसर झाले की झाकण ठेऊन २ मिनिटे वाफवून घ्यावे. (मंद आचेवर) असे केल्याने या सुरळीच्या पिठाला थोडा चमकदारपणा येतो. 
४. मिश्रण थंड होऊ देऊ नका. लगेच उलथन्याने मिश्रणाचा पातळ थर तेल लावलेल्या उलट्या ताटावर पसरवा. आणि सुरीने उभे काप करुन घ्यावे. त्यावर खवलेला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पेरावी.

५. थंड झाल्यावर त्याची सुरळी (गुंडाळी)करावी.
६. छोट्या कढई / फोडणीच्या भांड्यामध्ये तेल गरम करावे त्यात मोहोरी, कढीपत्ता,हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी.
७. सर्व्ह करताना सुरळीच्या वड्यांवर फोडणी,थोडी कोथिंबीर आणि खवलेला नारळ घालावा.
८. सुरळ्या (गुंडाळी) करायच्या आधी मिश्रणाच्या थरावर फोडणी घातली असेल तर वरून फोडणीची आवश्यकता नाही.

खमंग सुरळीच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत.

आता आपण खांडवी झटपट ६ मिनिटांत मायक्रोव्हेव ओवन मध्ये देखील बनवू शकतो. यासंदर्भातील रेसिपीचा एक व्हिडीओ पाहूयात... 

Web Title: Perfect recipe for making Gujarati Khandvi, easy to make and delicious traditional Khandvi recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.