मऊ, लुसलुशीत उकडीचे मोदक आणि त्यावर घातलेलं साजुक तूप, हा अनेकांच्या अतिशय आवडीचा पदार्थ. बऱ्याच जणांसाठी तर गणेशोत्सवाचं (Ganeshotsav) मुख्य आकर्षण म्हणजे हे उकडीचे मोदक असतात. पण बऱ्याचदा मोदकांसाठी घेतलेल्या साहित्याचं प्रमाण बिघडतं आणि मग मोदक काही धड जमत नाहीत. बाप्पाला असा बिघडलेल्या मोदकांचा नैवेद्यही दाखवावा वाटत नाही. शिवाय घरातले मोदक प्रेमी खवय्ये नाराज होतात, तो भाग तर वेगळाच. म्हणूनच उकडीचे मोदक (ukadiche modak recipe) करताना ते फाटू नयेत तसेच त्यांची चवही अगदी छान जमावी, यासाठी या काही टिप्स आणि रेसिपी. ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या cookingspecial112 या पेजवर शेअर करण्यात आली आहे.
उकडीचे मोदक फुटू नयेत म्हणून टिप्स आणि रेसिपी- सारण करण्यासाठी कढईत तूप घालून त्यात खाेवलेलं नारळ आणि साखर किंवा गूळ घालून मंच आचेवर परतून घ्या आणि शिजत ठेवा. सारण शिजत आलं की त्यात खसखस, वेलची पूड घाला. आणि सारण अगदी एकजीव करून घ्या. सारण एकजीव नाही केलं तर मोदक फुटण्याची शक्यता अधिक असते.
हरितालिकेच्या पुजेसाठी ऐनवेळी धांदल नको, करून ठेवा ६ गोष्टींची तयारी एक दिवस आधीच - मोदकाचं आवरण करण्यासाठी तांदळाचं पीठ आणि पाणी यांचं प्रमाण अगदी एक सारखं ठेवा. हे दोन्ही एकत्र करून उकळताना त्यात मीठ, तूप व तेल घाला. पाणी उकळल्यानंतर त्यात पीठ घालून हलवा. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्या. वाफ येऊ दिली नाही, घाई केली तरी मोदक फुटू शकतात. ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने अगदी मऊसर मळून घ्या. जितकं छान मळाल, तितके मोदक खास होतील.
- आता या पिठाची हातानेच छोटीशी पुरी बनवा. त्यात सारण घाला. आणि पुरीच्या कडा थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद करा आणि त्याचा मोदक करा. अशा पद्धतीने केलेले मोदक केळीच्या पानाला तूप लावून उकडायला ठेवा. मोदक फाटून सारण बाहेर येणार नाही.