कधी कधी नाश्त्याला काय करावं किंवा मग सुटीच्या दिवशी घरात सगळेजण जेव्हा असतात तेव्हा सायंकाळच्या चहासोबत काहीतरी थोडंसं पण चवदार खाण्यासाठी काय करावं असा प्रश्न बऱ्याच जणींना पडतोच. त्यासाठी हा खमंग ढोकळ्याचा पर्याय अगदी उत्तम ठरू शकतो. नेहमीचा त्याच त्या चवीचा ढोकळा खाऊन कंटाळला असाल तर आता डाळ- तांदूळ एकत्र करून केलेला हा ढोकळा करून पाहा (perfect recipe of spongy dhokla using dal and rice). या पद्धतीने केलेला ढोकळा लहान मुलंही आवडीने खातील.(Tips to make fluffy Dhokla at home)
डाळ- तांदळाचा खमंग ढोकळा करण्याची रेसिपी
डाळ- तांदळाचा ढोकळा कसा करावा, याची रेसिपी Ritika Sawant's Kitchen या सोशल मिडिया पेजवर शेअर करण्यात आली आहे.
साहित्य
१ वाटी तांदूळ
पाव वाटी हरबरा डाळ
सकाळी शाळेत जाण्याच्या गडबडीत लेकीच्या वेण्या घालायला खूपच वेळ लागतो? १ उपाय- झटपट घाला सुंदर वेण्या
पाव वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी पोहे
अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट
१ चमचा तेल
१ टीस्पून हळद
१ टीस्पून मिरची पावडर
चवीनुसार मीठ
अर्धा टीस्पून बेकिंग सोडा
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, कडिपत्ता, जिरे
कृती
एका भांड्यात डाळ, पोहे, तांदूळ एकत्र घ्या आणि सगळं साहित्य दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यामध्ये पाणी घालून ते ६ ते ७ तास भिजत ठेवा.
त्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून टाका आणि भिजवलेले सगळे पदार्थ मिक्सरमध्ये टाकून त्याचं बारीक पीठ करून घ्या.
डाएटिशियन सांगतात नाश्त्यामध्ये ४ पदार्थ मुळीच खाऊ नये- वजन आणि शुगर भराभर वाढेल
यानंतर हे पीठ एका भांड्यात काढून ६ ते ७ तास झाकून ठेवा. त्यानंतर ते छान आंबवलं जाईल आणि मस्त फुगून येईल.
यानंतर या मिश्रणात थोडं तेल, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, मिरचीची पेस्ट, हळद घाला आणि सगळं मिश्रण ४ ते ५ मिनिटे पुन्हा एकाच दिशेने फेटून घ्या.
यानंतर गॅसवर ढोकळ्याचं पात्र पाणी घालून गरम करायला ठेवा आणि त्यातल्या पाण्याला उकळी येईपर्यंत त्यावर झाकण ठेवा.
तोपर्यंत एका वाटीत २ ते ३ टेबलस्पून पाणी घ्या. त्यात अर्धा टी स्पून बेकिंग सोडा घाला आणि सगळं मिश्रण पुन्हा एकदा ५ ते ६ मिनिटांसाठी एकाच दिशेने फेटून घ्या
B12, D3 सप्लिमेंट्स योग्य वेळी घेतल्या तरच फायदेशीर ठरतील- बघा कोणती औषधी कधी घ्यावी
असं करताना पीठ आणखी फुगून येईल. हे पीठ लगेचच गरम करायला ठेवलेल्या ढोकळा पात्रातील प्लेटमध्ये ओता आणि झाकण ठेवून द्या. १५ ते २० मिनिटांत मंद ते मध्यम आचेवर गॅस राहू द्या. यानंतर ढोकळा छान फुलून येईल.
ढोकळा पुर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतरच तो प्लेटमध्ये काढा, त्यावर खमंग फोडणी घातली की चवदार नाश्ता झाला तयार..