Lokmat Sakhi >Food > माघी गणेश जयंती : मोदकाला कळ्या पाडण्याच्या २ झटपट ट्रिक्स, कळ्या होतील परफेक्ट नाजूक-सुंदर, सुबक...

माघी गणेश जयंती : मोदकाला कळ्या पाडण्याच्या २ झटपट ट्रिक्स, कळ्या होतील परफेक्ट नाजूक-सुंदर, सुबक...

How to make perfect modak kalya At Home : Perfect shaped modak : modak easy folding : How to Make perfect Shape Modak At Home : मोदक करायचा म्हणजे उत्तम कळ्या पडल्या पाहिजे, ते करण्यासाठीच दोन जबरदस्त सोप्या ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2025 16:40 IST2025-01-31T16:39:41+5:302025-01-31T16:40:12+5:30

How to make perfect modak kalya At Home : Perfect shaped modak : modak easy folding : How to Make perfect Shape Modak At Home : मोदक करायचा म्हणजे उत्तम कळ्या पडल्या पाहिजे, ते करण्यासाठीच दोन जबरदस्त सोप्या ट्रिक्स...

Perfect shaped modak modak easy folding Perfect shaped modak modak easy folding How to Make perfect Shape Modak At Home | माघी गणेश जयंती : मोदकाला कळ्या पाडण्याच्या २ झटपट ट्रिक्स, कळ्या होतील परफेक्ट नाजूक-सुंदर, सुबक...

माघी गणेश जयंती : मोदकाला कळ्या पाडण्याच्या २ झटपट ट्रिक्स, कळ्या होतील परफेक्ट नाजूक-सुंदर, सुबक...

माघी गणेशोत्सवाची सगळेचजण मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. माघी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी खास मोदक बनविण्याचा बेत आखला जातो. मोदक म्हटलं की गणपती बाप्पांचा (Perfect shaped modak) सगळ्यात आवडता पदार्थ. गणपती बाप्पासोबतच आपल्याला सुद्धा मोदक खायला भरपूर आवडतात. महाराष्ट्रामध्ये विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. या उत्सवादरम्यान साटोरी, पुरण पोळी, श्रीखंड आणि लाडू यांसारखे पदार्थ सर्रास खाल्ले जातात. पण या सणात मोदकांपेक्षा दुसरा कोणताच पदार्थ इतका लोकप्रिय नाही(How to make perfect modak kalya At Home).

बाप्पासाठी हे उकडीचे मोदक बनवण्याचा घाट घातला जातो. घरातल्या प्रत्येकाला मोदक खायला जितके आवडतात तितकेच ते बनवताना गृहिणींची दमछाक होते. मोदक बनवणे हे सोपे काम (How to Make perfect Shape Modak At Home) नाही. प्रत्येकाला उकडीचे मोदक बनवायला जमतातच असे नाही. उकडीचे मोदक दिसायला आकर्षक दिसतात ते त्यांच्या बारीक कळ्यांमुळेच. जितक्या या कळ्या बारीक, नाजूक व सुबक असतात तितकी ती गृहिणी स्वयंपाक करण्यात उत्तम आहे असे मानले जाते. अनेकजण साच्याने किंवा हाताने कळ्या पाडून मोदक तयार करतात. असे असले तरीही कळ्या पाडून तयार केलेले मोदक दिसायलाही खूप सुरेख दिसतात. पण सर्वांना मोदकाच्या कळ्या करणं जमतच असे नाही, अनेकदा कळ्या करताना मोदकाची पारी फाटके किंवा त्यांचा आकार नीट येत नाही. अशावेळी कळ्या चांगल्या बनवण्यासाठी दोन झटपट ट्रिक पाहूयात. ही ट्रिक फॉलो करुन आपण कळ्या असलेले सुंदर उकडीचे मोदक तयार  करु शकता. 

उकडीच्या मोदकाला कळ्या पाडण्याच्या २ सोप्या ट्रिक... 

१. चमच्याचा वापर :- उकडीचे मोदक बनवताना त्याच्या कळ्या अनेकदा नीट पडत नाही. उकडकीच्या मोदकाला चमच्याच्या साहाय्याने अगदी सोप्या पद्धतीने कशा कळा पाडायच्या ते पाहूयात. यासाठी आपल्याला एका छोट्या चमच्याची मदत लागणार आहे. उकडलेल्या तांदळाच्या पिठाचा गोळा करुन चांगला मळून घ्यावा. यानंतर हाताला थोडे पीठ किंवा तेल लावून त्याला हाताने पूरीसारखा पण खोलगट आकार द्यावा. आता या खोलगट पुरीमध्ये मोदकासाठी बनवलेले गूळ, खोबऱ्याचे सारण चमचाने व्यवस्थित भरावे. यानंतर पुरी सर्व बाजूने पूर्ण बंद करुन घ्यावी आणि त्याला मोदकाचा आकार द्यावा. आता चमचाच्या मदतीने मोदकावर ठरावीक अंतरावर खाचा करुन कळ्या पाडाव्यात. अशाप्रकारे चमच्याच्या मदतीने आपण अगदी सोप्या पद्धतीने मोदकाच्या कळ्या तयार करु शकता. यामुळे मोदक दिसायलाही सुंदर, सुबक व नाजूक  दिसतील.

दीपिका पादुकोणला आवडतो तसा ‘रस्सम राइस’ करायचाय? ही घ्या स्पेशल साऊथ इंडियन रेसिपी...

२. तांदुळाच्या कोरड्या पिठाचा वापर :- मोदकाच्या कळ्या अधिक नाजूक व सुंदर - सुबक येण्यासाठी आपण तांदुळाच्या कोरड्या पिठाचा वापर करु शकतो. हाताला तांदुळाचे कोरडे पीठ भुरभुरवून लावून मग मोदकाच्या कळ्या पाडाव्यात. यामुळे पीठ हाताला चिकटत नाही आणि मोदकाला नाजूक व सुंदर - सुबक कळ्या पाडणे सोपे जाते. सर्वातआधी हाताला थोड कोरड तांदुळाच पीठ लावून घ्यावे त्यानंतर पहिल्या ३ बोटांच्या मदतीने या मोदकाच्या पारीला कळ्या पाडाव्यात. अंगठा आणि आपले मधले बोट यांच्या चिमटीत पारी धरून पहिल्या बोटाने मध्यावर दाब देत मोदकाच्या नाजूक व सुंदर - सुबक कळ्या पाडून घ्याव्यात. मोदकाची पारी मधोमध किंचित जाडसर व कडेला पातळ असावी, म्हणजे मोदक वाफवताना फुटत नाहीत आणि कळ्या सुबक आकाराच्या येतात.

पाहा झटपट कणीक मळण्याची भन्नाट युक्ती, वेळही कमी लागतो, कणिकही होते मऊसूत...


Web Title: Perfect shaped modak modak easy folding Perfect shaped modak modak easy folding How to Make perfect Shape Modak At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.