Lokmat Sakhi >Food > भाकरी थापताना तुटते, तर कधी फुगतच नाही? भाकरी करण्याची १ सोपी पद्धत, फुगेल पुरीसारखी टम्म..

भाकरी थापताना तुटते, तर कधी फुगतच नाही? भाकरी करण्याची १ सोपी पद्धत, फुगेल पुरीसारखी टम्म..

Perfect way of making Jowar Roti Bhakri : भाकरी छान मऊ-लुसलुशीत तर होईलच पण ती छान पुरीसारखी फुगायलाही मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 11:20 AM2023-05-05T11:20:09+5:302023-05-05T11:25:39+5:30

Perfect way of making Jowar Roti Bhakri : भाकरी छान मऊ-लुसलुशीत तर होईलच पण ती छान पुरीसारखी फुगायलाही मदत होईल.

Perfect way of making Jowar Roti Bhakri : 1 easy way to make bhakri | भाकरी थापताना तुटते, तर कधी फुगतच नाही? भाकरी करण्याची १ सोपी पद्धत, फुगेल पुरीसारखी टम्म..

भाकरी थापताना तुटते, तर कधी फुगतच नाही? भाकरी करण्याची १ सोपी पद्धत, फुगेल पुरीसारखी टम्म..

नेहमी गहू खाल्लेला चांगला नाही म्हणून आहारात ज्वारी, बाजरी किंवा नाचणीच्या भाकरीचा समावेश करायला सांगितला जातो. त्याप्रमाणे दुपारच्या जेवणात पोळी खाल्ली की आपण रात्रीच्या जेवणासाठी काही वेळा गरम भाकरी करतो. पोळ्या करणे आपल्या सवयीचे असते, मात्र भाकरी करणे म्हणावे तितके सवयीचे नसल्याने आपली भाकरी तितकी छान होत नाही. आपण पीठ भिजवतो आणि ताट किंवा परातीतही पीठ घेऊन भाकरी थापायला घेतो. मात्र ती म्हणावी तितकी एकसारखी थापली जात नाही. इतकेच नाही तर काही वेळा थापताना ही भाकरी तुटते, कधी तव्यावर घेतल्यावर ती चिकटून बसते आणि फुगतच नाही (Perfect way of making Jowar Roti Bhakri). 

आई, नाश्त्याला काहीतरी भारी कर! म्हणणाऱ्या मुलांसाठी करा ३ भन्नाट पदार्थ, नाश्ता सुपरकुल!

भाकरीचे पीठ मळणे, ती एकसारखी थापणे आणि नीट भाजणे या सगळ्या स्टेप्स अतिशय महत्त्वाच्या असतात. आज आपण ज्वारीची भाकरी करण्याची एक सोपी पद्धत पाहणार आहोत. ज्यामुळे भाकरी छान मऊ-लुसलुशीत तर होईलच पण ती छान पुरीसारखी फुगायलाही मदत होईल. भाकरी ग्लुटेन फ्री असल्याने ती आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. तसेच ज्वारीच्या भाकरीतून फायबर, प्रोटीन, मॅग्नेशियम हे सगळे घटक चांगल्या प्रमाणात मिळतात. वजन कमी करण्यासाठीही ज्वारीची भाकरी उपयुक्त ठरते. पिठलं-भाकरी, पालेभाजी आणि भाकरी किंवा आमटी-भाकरी हे आपल्याकडे अतिशय आवडीने खाल्ले जाणारे कॉम्बिनेशन. म्हणूनच आहारात या भाकरीचा आवर्जून समावेश करायला हवा. पाहूया ज्वारीची भाकरी करण्याची सोपी पद्धत..

(Image : Google)
(Image : Google)

१. एका कढईत किंवा पातेल्यात पाणी गरम करायला ठेवावे. त्यामध्ये मीठ आणि तूप घालावे. 

२. आवडत असेल तर यामध्ये तीळ घालायचे आणि ज्वारीचे पीठ घालून चांगले ढवळायचे. 

३. गॅस बंद करुन त्यावर १० मिनीटे झाकण ठेवून १ वाफ काढायची.

४. मग हे पीठ एका ताटलीत घेऊन हाताने नेहमीसारखे चांगले मळून घ्यायचे. 

५. एकसारखे गोळे करुन पोळ्या लाटण्याने लाटतो त्याचप्रमाणे भाकरी लाटून घ्यायची.  

६. त्यानंतर एक बाजू तव्यावर आणि एक बाजू थेट गॅसवर भाजायची. भाकरी छान टम्म फुगते.

७. मग तूप लावून ही भाकरी नुसतीही अतिशय छान लागते. नाहीतर कोणत्याही भाजी-आमटीसोबत खायची. 

Web Title: Perfect way of making Jowar Roti Bhakri : 1 easy way to make bhakri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.