शुभा प्रभू साटम
घरोघर गणपतीचं गौराईचं आगमन झालं. आता गौराईला निरोप देणं, पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जनही होईल. मात्र अजून दहा दिवस गणपती आहे. रोज खिरापत करताना वैविध्य हवं आणि चवबदलही. गणपतीचे लाडकोड करताना घर मंदीर होऊन जातं. पारंपरिक पदार्थ, नैवेद्य, पाहुण्यांसाठी खास मेन्यू असं सगळं साग्रसंगीत होतं. पण भारतभर काही खास पदार्थ केले जातात. त्यापैकीच काही हे वेगळे नैवेद्य, नक्की करुन पाहा. हे पदार्थ भारताच्या वेगवेगळ्या भागात देवाला/गौरीला अर्पण केले जातात.
हा कर्नाटकी प्रकार आहे, म्हणजे अननसाचा शिरा.
साहित्य: बारीक रवा १ वाटी, छान पिकलेला अननस छोटे तुकडे करून १/२वाटी, साखर पाऊण ते अर्धा वाटी. पाणी १ १/२ वाटीआवडीने काजू ,वेलची,शक्यतो केशर नको
कृती
तूप तापवून सुका मेवा परतून बाजूला करावात्यात हवं तर अधिक तूप घालून रवा मंद आगीवर सुरेख खमंग भाजून घ्यावा.बाजूला काढून, त्यात सुका मेवा मिसळून ठेवावा. पसरट भांड्यात पाणी उकळत ठेवावे, त्यात अननस तुकडे घालुन उकळी आली की मंद आग करून ,रवा घालून, परतून साखर घालावी,व्यवस्थित ढवळून मंद आगीवर दणदणीत वाफ काढावी,शेवटी वेलची घालावी,वाटल्यास अननस इसेन्स घालू शकता, शेवटी घालावा.
चिरौंजी मखाना खीर (चारोळी मखाने खीर)
चारोळी १ वाटी निवडून भिजत घालावी.खवट किंवा किडकी चारोळी काढून टाकावी.मखाने पाव वाटीखूप पिकलेली केळी २दाट घट्ट असे मलईदार दूध १लिटरसाखर थोडीशीमिल्क मेड अर्धी वाटीवेलची काजू बदाम
कृती
दूध आटवत ठेवावे,थोडे आटले की निवडलेली, भिजवलेली चारोळी घालून मंद आगीवर ढवळत शिजवत राहावे,बाजूला दुसऱ्या भांड्यात तूप तापवून त्यात मखाने लालसर करून बाजूला ठेवावेत.त्यात सुका मेवा तळून घ्यावा.या तुपात थोडी साखर लालसर करून (कॅरॅमल करून)केळी त्यात छान लपेटून घेऊन बाजूला ठेवावी. आटत असलेल्या दुधात मिल्क मेड घालावे,गोडाचा अंदाज घेऊन साखर वाढवावी,नंतर मखाने,सुका मेवा, वेलची, केळी सर्व घालून,ढवळून गॅसवरून उतरवून ठेवावे. अत्यंत चवदार अशी खीर तयार.
(लेखिका खाद्य संस्कृतीच्या अभ्यासक आहेत.)