काहीतरी वेगळं तयार करून खाण्याची मज्जाच वेगळी आहे. पदार्थ आवडला तर छानच नाही आवडला तरी प्रयोग वाया जात नाही. त्याच त्याच रेसिपी तयार करून कधी तरी कंटाळा येतो.(Pinkish Sweet Potato Dessert, Try This Recipe) रोजच्या जेवणाबाबत असे प्रयोग करू शकत नाही. तर मग तोंडी लावायला घ्यायच्या पदार्थांमध्ये करायचे. एखादा वेगळाच गोड पदार्थ तयार करून बघायचा. अशीच काहीशी निलूस किचन या चॅनलवरील ही रेसिपी आहे. तुम्ही याआधी नक्कीच कधी तयार केली नसेल.(Pinkish Sweet Potato Dessert, Try This Recipe)
दिसायलाही फार छान आणि वेगळी आहे. त्याच त्याच मिठाई खाण्यापेक्षा काहीतरी वेगळा प्रकार तयार करून बघा. गोड पदार्थ तयार करण्यासाठी खरं तर फार कष्ट लागतात. मात्र हा पदार्थ तयार करणेही तसे सोपे आहे.
साहित्य
रताळे, दूध, मिल्क पावडर, साखर, वेलची पूड, तूप, डेसिकेटेड कोकोनट, बीट, पिठीसाखर, बटर पेपर
कृती
१. प्रथम रताळे उकडून घ्या. ते छान मऊ होऊ द्या. त्यानंतर त्याची साले काढून घ्या. एका चाळणीमध्ये रताळे घेऊन त्यावर जोर देऊन ते बारीक करून घ्या.
२. पॅनमध्ये तूप घ्या. तुपावर दूध ओता. त्यामध्ये साखरसुद्धा घाला. आता स्मॅश केलेले रताळे त्यामध्ये घाला.
३. ते मिश्रण घट्ट होऊ द्या. जरा घट्ट झाल्यावर त्यामध्ये मिल्क पावडर घाला आणि ते मळून घ्या. त्याची लांब जाड पट्टी तयार करून घ्या. नळीसारखा आकार द्या. त्याला फॉइल पेपर लावा आणि फ्रिजमध्ये ठेवा. आपलं सारण तयार होईल.
४. आता एका वाडग्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घ्या. त्यामध्ये मिल्क पावडर घाला. पिठीसाखरही घाला. बीटाचा रस तयार करून घाला. आणि त्याचे पीठ मळून घ्या.
५. आता तयार गुलाबी पीठाची चौकोनी पोळी लाटा आणि तयार करून ठेवलेले सारण त्यावर ठेवा. चारही बाजूंनी लाटलेल्या पीठाने सारण बंद करा. बटर पेपरचा वापर करून त्याला नीट आकार द्या.
६. तयार मिठाई सेट झाली की त्याचे चौकोन कापून घ्या.