महाराष्ट्रात पिठलं - भाकरी खाण्याची परंपरा आहे (Pithla Recipe). ज्वारीची भाकरी असो किंवा तांदुळाची; पिठलं भातासोबत देखील चविष्ट लागतो. पण बहुतांश लोकांना झुणका आणि पिठलं यातलं फरक समजत नाही (Cooking Recipe). झुणका बहुधा भाकरीसोबत तर पिठले भाताबरोबर खातात (Food). खाद्यपदार्थातील 'झुणका-भाकर' ही जोडगोळी प्रसिद्ध आहे. पण पिठलं देखील भाकरीसोबत चविष्ट लागते.
झणझणीत पिठलं आपण खाल्लं असेल पण कधी ताकातलं पिठलं खाऊन पाहिलं आहे का? ताकातलं पिठलं बनवायला सोपं आहे. शिवाय झटपट तयार होते. पण ताकातलं पिठलं कसं तयार करायचं? पाहूयात(Pithla Recipe | Takatla Pithla - Maharashtrian Recipe).
ताकातलं पिठलं कसं करायचं?
लागणारं साहित्य
दही
पाणी
बेसन
तेल
मोहरी
रोजरोज चपात्या लाटण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीनं चपात्या केल्या तर ३ महिने टिकतात
जिरं
हिंग
हळद
आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट
कडीपत्ता
कांदा
कोथिंबीर
कृती
सर्वात आधी एका बाऊलमध्ये एक कप बेसन घ्या. त्यात एक कप ताक आणि २ कप दही घालून मिक्स करा. आता एक कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ टेबलस्पून तेल घाला. नंतर त्यात एक चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमुटभर हिंग, हळद, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालून भाजून घ्या. नंतर त्यात कडीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून भाजून घ्या.
ना रवा - ना इनो; १० मिनिटात इन्स्टंट कुरकुरीत डोसा करण्याची सोपी कृती; नाश्ता होईल झटपट
नंतर त्यात ताकातलं बेसन आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. सतत चमच्याने ढवळत राहिल्याने गुठळ्या होणार नाही. नंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटांसाठी वाफेवार पिठलं शिजवून घ्या. शेवटी कोथिंबीर भुरभुरून मिक्स करा. अशाप्रकारे ताकातलं पिठलं खाण्यासाठी रेडी.