Lokmat Sakhi >Food > पितृपंधरवडा स्पेशल : पितृपक्षाच्या स्वयंपाकात डाव्या बाजूला आमसूल चटणी तर हवीच; झटपट रेसिपी, चटणीचे आरोग्यदायी फायदे...

पितृपंधरवडा स्पेशल : पितृपक्षाच्या स्वयंपाकात डाव्या बाजूला आमसूल चटणी तर हवीच; झटपट रेसिपी, चटणीचे आरोग्यदायी फायदे...

Pitru Paksha Special Aamsul Chatni Recipe and Benefits :पितृपक्षाच्या स्वयंपाकात भरड्याचे वडे, तांदळाची खीर यांना जसे महत्त्व आहे तसेच या चटणीलाही विशेष महत्त्व असते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 12:54 PM2022-09-13T12:54:49+5:302022-09-13T13:28:07+5:30

Pitru Paksha Special Aamsul Chatni Recipe and Benefits :पितृपक्षाच्या स्वयंपाकात भरड्याचे वडे, तांदळाची खीर यांना जसे महत्त्व आहे तसेच या चटणीलाही विशेष महत्त्व असते

Pithripandharvada Special: Amsool chutney is a must in the cooking of Pitrupaksha; Quick recipe, healthy benefits of chutney... | पितृपंधरवडा स्पेशल : पितृपक्षाच्या स्वयंपाकात डाव्या बाजूला आमसूल चटणी तर हवीच; झटपट रेसिपी, चटणीचे आरोग्यदायी फायदे...

पितृपंधरवडा स्पेशल : पितृपक्षाच्या स्वयंपाकात डाव्या बाजूला आमसूल चटणी तर हवीच; झटपट रेसिपी, चटणीचे आरोग्यदायी फायदे...

Highlightsशरीरातील उष्णता वाढली असल्यास अमसूल खाण्याचा सल्ला दिला जातोतुम्हाला थोडे जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही वरुन लाल तिखट घालू शकता

रोजचा स्वयंपाक असो नाहीतर सणावाराचा किंवा अगदी पितृपक्षाचा. डाव्या बाजूची चटणी, कोशिंबीर हे पदार्थ ताटात लागतातच. एरवी आपण एखादी कोरडी चटणी तोंडी लावायला सोबत घेतो. नैवेद्याचे किंवा सणावाराचे ताट असेल तर पंचामृत किंवा खोबऱ्याची ओली चटणी आवर्जून केली जाते. पण पितृपक्षाच्या नैवेद्यासाठी मात्र आवर्जून आमसूलाची चटणी केली जाते. एरवी आपण आमसूलाचे सरबत, सार असे पदार्थ पितो. इतकेच नाही तर काही पदार्थांमध्ये चव येण्यासाठी आपण आमसूल घालतो. पण आमसूलाची चटणी मात्र आपण मुद्दाम करत नाही. पितृपक्षाच्या स्वयंपाकात भरड्याचे वडे, तांदळाची खीर यांना जसे महत्त्व आहे तसेच या चटणीलाही विशेष महत्त्व असते (Pitru Paksha Special Aamsul Chatni Recipe and Benefits). 

(Image : Google)
(Image : Google)

काहीवेळा आपल्याला खूप पदार्थ करायचे असल्याने आपण खूप घाईत असतो. अशावेळी एखादा पदार्थ चुकतो. पण कधीतरीच केला जाणारा हा पदार्थ चुकला की मात्र आपल्याला हुरहूर लागते. घरात आलेले गुरुजी, पाहुणे सगळे पोटभर जेवले पाहिजेत आणि तृप्त होऊन बाहेर पडले पाहिजेत असे आपल्याला मनोमन वाटत असते. अशावेळी ही आमसूलाची चटणी झटपट आणि परफेक्ट करण्यासाठी काय करायचं पाहूया...

साहित्य -

१. आमसूल - ८ ते १० 

२. जीरे - १ चमचा

३. मिरे - ४ ते ५ 

४. गूळ - १ ते १.५ वाटी

५. खडे मीठ - चवीनुसार  

कृती -

१. गरम पाण्यात आमसूल १.५ तास भिजवून ठेवायची.

२. मिक्सरच्य़ा भांड्यात जीरे, मिरं आणि खडेमीठ बारीक वाटून घ्यायचे.

३. याच मिक्सरच्या भांड्यात भिजलेली आमसूलं आणि त्याचेच थोडे पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवा. 

४. यामध्ये जवळपास दुप्पटहून जास्त गूळ घालून सगळे पुन्हा एकदा मिक्सर करा.   

५. आता चटणी खाण्यासाठी तयार आहे. मात्र तुम्हाला थोडे जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही वरुन लाल तिखट घालू शकता.

(Image : Google)
(Image : Google)

आमसूल चटणीचे आरोग्यदायी फायदे..

१. अमसूल हे पित्तनाशक आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार अपचनाचा, पित्ताचा त्रास होतो, त्यांनी नियमितपणे अमसूल खावे.

२. खाज येणे, पुरळ येणे अशा त्वचाविकारांसाठीही अमसूल फायदेशीर आहे.

३. शरीरातील उष्णता वाढली असल्यास अमसूल खाण्याचा सल्ला दिला जातो. 

४. मानसिक ताण आणि थकवा घालविण्यासाठीही आमसूल उपयुक्त ठरते.

५. आजारपणामुळे झालेली शारीरिक झीज भरून येण्यासाठीही अमसूलाचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

६. तोंडाची चव गेली असेल, अन्नावरची वासना उडाली असेल तर अशा व्यक्तींना अमसूलाची चटणी द्यावी.
 

Web Title: Pithripandharvada Special: Amsool chutney is a must in the cooking of Pitrupaksha; Quick recipe, healthy benefits of chutney...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.