Lokmat Sakhi >Food > पितृपंधरवडा : पारंपरिक आंबटगोड आमसूल चटणी नैवैद्याला हवीच, आमसूल चटणी खाण्याचे ८ फायदे

पितृपंधरवडा : पारंपरिक आंबटगोड आमसूल चटणी नैवैद्याला हवीच, आमसूल चटणी खाण्याचे ८ फायदे

Pitru Paksha Amsul Kokam Chutney Recipe and benefits : ही चटणी आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2023 05:21 PM2023-10-04T17:21:48+5:302023-10-05T15:31:45+5:30

Pitru Paksha Amsul Kokam Chutney Recipe and benefits : ही चटणी आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरते.

Pithripandharvada Special Pitru Paksha Amsul Kokam Chutney Recipe and benefits : Easy recipe of Sweet and Sour Amsool Chutney for offering plate, 8 health benefits | पितृपंधरवडा : पारंपरिक आंबटगोड आमसूल चटणी नैवैद्याला हवीच, आमसूल चटणी खाण्याचे ८ फायदे

पितृपंधरवडा : पारंपरिक आंबटगोड आमसूल चटणी नैवैद्याला हवीच, आमसूल चटणी खाण्याचे ८ फायदे

पितृ पक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करुन त्यांची पूजा करणे आणि  त्यांना नैवेद्य दाखवणे. त्यानिमित्ताने अन्नदान करणे किंवा कोणत्याही स्वरुपातील दानाला या काळात विशेष महत्त्व असते. पूर्वजांनी जे काही सत्कर्म केले त्या पुण्यावरच पुढच्या पिढ्यांच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. म्हणूनच पूर्वजांची आठवण करणे आणि त्यांना मनोभावे नमस्कार करणे हे या पितृ पक्षातील मुख्य कार्य. या निमित्ताने दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यात नेहमीच्या पदार्थांपेक्षा काही वेगळे पदार्थ आवर्जून केले जातात. त्यात तांदळाची खीर, भरड्याचे वडे, भोपळा, गवार यांची भाजी आणि डाव्या बाजूचा आणखी एक पदार्थ अवश्य केला जातो तो म्हणजे आमसूलाची आंबट गोड चटणी. एरवी आपण ही चटणी करतोच असे नाही. पण पितृ पक्षाच्या विधीला ही चटणी नक्की केली जाते. यामागे नेमके कारण माहित नसले तरी या कालावधीत ही चटणी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. करायला अतिशय सोपी, चविष्ट लागणारी ही चटणी आरोग्याच्या बऱ्याच समस्या दूर करण्यास उपयुक्त ठरते. ही चटणी करण्याची रेसिपी आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत ते पाहूया (Pitru Paksha Amsul Kokam Chutney Recipe and benefits)... 

साहित्य -

१. आमसूल - ८ ते १० 

२. जीरे - १ चमचा

३. मिरे - ४ ते ५ 

(Image : Google )
(Image : Google )

४. गूळ - १ ते १.५ वाटी

५. खडे मीठ - चवीनुसार  

कृती -

१. गरम पाण्यात आमसूल १.५ तास भिजवून ठेवायची.

२. मिक्सरच्य़ा भांड्यात जीरे, मिरं आणि खडेमीठ बारीक वाटून घ्यायचे.

३. याच मिक्सरच्या भांड्यात भिजलेली आमसूलं आणि त्याचेच थोडे पाणी घालून पुन्हा मिक्सर फिरवा. 

४. यामध्ये जवळपास दुप्पटहून जास्त गूळ घालून सगळे पुन्हा एकदा मिक्सर करा.   

५. आता चटणी खाण्यासाठी तयार आहे. मात्र तुम्हाला थोडे जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही वरुन लाल तिखट घालू शकता.

आमसूल चटणीचे आरोग्यदायी फायदे..

१. अमसूल हे पित्तनाशक आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार अपचनाचा, पित्ताचा त्रास होतो, त्यांनी नियमितपणे अमसूल खावे.

२. खाज येणे, पुरळ येणे अशा त्वचाविकारांसाठीही अमसूल फायदेशीर आहे.

३. शरीरातील उष्णता वाढली असल्यास अमसूल खाण्याचा सल्ला दिला जातो. 

४. मानसिक ताण आणि थकवा घालविण्यासाठीही आमसूल उपयुक्त ठरते.

५. आजारपणामुळे झालेली शारीरिक झीज भरून येण्यासाठीही अमसूलाचे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो.

६. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि हृदयविकारांपासून दूर राहण्यासाठी आमसूलाचा चांगला उपयोग होतो. 

७. आमसूलातून शरीराला पोटॅशियम, व्हिटॅमिन्स, मॅग्नेशियम आणि फायबर्स चांगल्या प्रमाणात मिळण्यास मदत होते.

८. तोंडाची चव गेली असेल, अन्नावरची वासना उडाली असेल तर अशा व्यक्तींना अमसूलाची चटणी द्यावी.
 


 

 

 

Web Title: Pithripandharvada Special Pitru Paksha Amsul Kokam Chutney Recipe and benefits : Easy recipe of Sweet and Sour Amsool Chutney for offering plate, 8 health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.