गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पक्ष पंधरवाडा ( Pitru paksha pandharwada) सुरू होतो. नवरात्रीच्या आधीपर्यंत पक्ष पंधरवाडा असतो. या दिवसांत आपापल्या घरच्या किंवा प्रांतातल्या पद्धती आणि परंपरा यानुसार मृत व्यक्तींचे पक्ष घातले जाते आणि त्यासाठीच्या जेवणात काही विशिष्ट पदार्थ ठरलेले असतात. पक्ष पंधरवाड्यादरम्यान मराठवाड्यात जे काही पदार्थ बनविले जातात, त्यापैकी एक मुख्य पदार्थ म्हणजे दहीवडे (How to make dahi vada). दहीवड्यांशिवाय मराठवाड्यात पितृपक्षाचा नैवेद्य पुर्ण होत नाही. दहीवडे मऊ- लुसलुशीत व्हावेत किंवा उत्तम चवदार दहीवडे कसे करावेत, यासाठी ही रेसिपी (dahi vada recipe) आणि काही खास टिप्स.
कसे करायचे दहीवडेसाहित्यअर्धी वाटी उडदाची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ, चवीनुसार मीठ, २ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून जिरे पूड आणि अर्धा टी स्पून मिरेपूड, २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, वडे तळण्यासाठी तेल, १ वाटी घट्ट दही, एक ते दिड टेबलस्पून साखर.रेसिपी१. उडदाची डाळ आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून ५ ते ६ तासांसाठी पाण्यात भिजत घालावी.
आता करा बिनातेलाची पावभाजी! तेल- तूप- बटर घालण्याची गरजच नाही... तरी भाजी होईल चविष्ट आणि झटपट
२. यानंतर डाळीतले पाणी काढून टाकावे आणि दोन्ही डाळी तसेच मिरची, कोथिंबीर मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यावे.
३. अगदी बारीक पेस्ट करू नये. मिश्रण थोडे जाडेभरडे ठेवावे. त्यामुळे वडे तळताना जास्त तेल लागत नाही. तसेच वड्यांचे पीठ घट्ट असावे. या पीठात जिरेपूड, मिरेपूड आणि चवीनुसार मीठ टाका.
४. दही फेटून घ्या आणि त्यात पाणी घालून ते थोडे पातळ करून घ्या. त्यात थोडे मीठ आणि साखर टाकून घ्या.
५. आता कढईत तेल टाकून ती गरम करायला ठेवा. तेल तापल्यानंतर चमच्याने किंवा हाताने त्यात वडे सोडा आणि मध्यम आचेवर तळून घ्या. वड्यांचा आकार मध्यम असावा.
ॲसिडीटी आणि मायग्रेनचा त्रास कमी करणारा खास हर्बल टी! रोज सकाळी प्या.. ॲसिडीटी गायब
६. वडे तळत असताना बाजूला एक पाण्याने भरलेला बाऊल ठेवा. तळलेला वडा पाण्यात टाकावा. आणि अवघ्या २० ते ३० सेकंदात पाण्यातून काढून पातळ केलेल्या दह्यात टाका.
७. तळलेला वडा पाण्यातून काढल्याने तो मऊ होतो, त्यात दही चांगले मुरते शिवाय त्यातले तेलही कमी होते.