Lokmat Sakhi >Food > पितृपक्षात तांदळाची खीर करताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स; घट्ट, रबडीसारखी खीर बनेल घरीच

पितृपक्षात तांदळाची खीर करताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स; घट्ट, रबडीसारखी खीर बनेल घरीच

Pitru Paksha Special Rice Kheer Recipe (Tandalachi kheer kashi karavi) :

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 09:56 AM2023-10-03T09:56:52+5:302023-10-03T11:15:31+5:30

Pitru Paksha Special Rice Kheer Recipe (Tandalachi kheer kashi karavi) :

Pitru Paksha Special Rice kheer Making Method : How to make rice kheer easy ways to making rice kheer | पितृपक्षात तांदळाची खीर करताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स; घट्ट, रबडीसारखी खीर बनेल घरीच

पितृपक्षात तांदळाची खीर करताना लक्षात ठेवा सोप्या टिप्स; घट्ट, रबडीसारखी खीर बनेल घरीच

पितृपक्षात (Pitru Paksha 2023) श्राद्धाच्या पानात ठेवण्यासाठी खिरीचं फार महत्व असतं. (Pitru Paksha
Special) पितृंना  नेवेद्य दाखवण्यासाठी खीर लागतेच किंवा सणाच्या दिवशी नैवेद्यासाठी ताटात गोड पदार्थ वाढण्यासाठी खीर आवर्जून बनवली जाते. (tandalachi kheer Recipe) तांदळाची खीर सोपी असली तरी कधी खीर जास्त पातळ होते तर कधी कमी गोड. योग्य पद्धतीनं खीर बनवणं सर्वांनाच जमत असं नाही. खीर बनवण्याची साधी, सोपी रेसिपी पाहूया. ( How to make rice kheer)

तांदळाची खिरीसाठी लागणारं साहित्य

१) बारीक तांदूळ- १ कप

२) दूध- १ लिटर

३) साखर- १ ते दीड कप

४) वेलची पावडर - १ ते दीड टिस्पून

५) ड्रायफ्रुट्सचे काप- १ ते दीड कप

६) केशर- सजावटीसाठी 

७) कंडेन्स मिल्क (Optional)-  अर्धा कप 

तांदळाची खीर बनवण्याची कृती

१) तांदळाची खीर बनवण्यासाठी १ लिटर  दूध कढईत घालून गॅसवर गरम करायला ठेवा. दूध व्यवस्थित गरम होईपर्यंत चमच्याच्या साहाय्याने ढवळत राहा अन्यथा दूध कढईला चिकटू शकतं. दूध आटवायला ठेवल्यानंतर अर्ध होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या. 

१० रूपयांचा बिस्कीट पुडा घ्या घरी करा स्वादीष्ट गुलाबजाम, मावा-मैदा न घालताच बनतील परफेक्ट

२) एक लिटर दुधासाठी अर्धा कप तांदूळ घ्या. दूध उकळायला ठेवलेलं असताना दुसरीकडे तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. २ ते ३ वेळा तांदूळ धुतल्यानंतर  थोडावेळ पाण्यात भिजवून ठेवा. खिरीसाठी बारीक तांदळाचा वापर करा. दुधाच्या किनाऱ्यांना चमच्याने व्यवस्थित खरडून दूधात घाला जेणेकरून दूध अजून घट्ट होईल.

३) धुतलेले तांदूळ दूधाच्या  कढईत घाला. मग दूध चमच्याने ढवळत राहा. तांदूळ ७० टक्के शिजेपर्यंत वाट पाहा. भात पूर्णपणे शिजणार नाही याची काळजी घ्या नाही तर खिरीची चव बिघडू शकते. १० मिनिटांनंतर तांदूळ थोडे शिजले की दूधात साखर घाला. १ ते दीड कप साखर घाला. त्यानंतर बारीक केलेले  ड्रायफ्रुट्सचे तुकडे, वेलची पावडर आणि केशरचं दूध घाला. त्यानंतर ८ ते १० मिनिटं पुन्हा शिजवून घ्या. 

डाळ-तांदूळ वाटताना 'हा' पदार्थ घाला; डोश्याचं पीठ मस्त फुलेल, सॉफ्ट-जाळीदार होतील डोसे

४) खीर बनवताना कधीही साखर आधी घालू नका. तांदळाच्या आधी साखर घातली तर तांदूळ व्यवस्थित शिजणार नाही. ८ ते  १० मिनिटांनी खीर तयार झालेली असेल. तुम्ही तांदळाचे दाणे चमच्याने दाबून खीर शिजली आहे की नाही ते पाहू शकता. जर खीर शिजली नसेल तर अजून थोडावेळ शिजवा.  तांदूळ आणि ड्रायफ्रुट्स आधी  तुपात भाजून मग दूधात घालू शकता.

५) तुम्हाला तर खीर पातळ हवी असेल तर तुम्ही यात अजून दूध किंवा गरम पाणी घालून शिजवून घ्या. खीर जास्त पातळ वाटत असेल तर त्यात घट्टपणा येण्यासाठी कंडेन्स मिल्क घाला. तर गॅस बंद करून गरमागरम खीर सर्व्ह करा. ही खीर तुम्ही चपाती किंवा पुरीबरोबर खाऊ शकता. पिस्ता, बदाम किंवा केशराने खीर सजवून घ्या. 

Web Title: Pitru Paksha Special Rice kheer Making Method : How to make rice kheer easy ways to making rice kheer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.