गणपती बाप्पांचे विसर्जन झाल्यावर पितृपक्ष सुरु होते. पितृपक्षाचा काळ पूर्वजांसाठीचा असतो असे आपण मानतो. या काळात पूर्वजांना श्रद्धांजली दिली जाते. पितृपक्षात पितरांची पूजा आणि स्मरण करुन त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो. पितृपक्षाचा स्वयंपाक करायचा म्हटलं की त्यात काही अमुक पदार्थ हे करावेच लागतात. पितृपक्षाचा स्वयंपाक करताना त्यात वरण भात, खीर, वडे, तळणीचे पदार्थ, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असे अनेक पदार्थ तयार करावे लागतात(Pitrupaksh Recipe).
भाज्यांमध्ये देखील काही मोजक्याच ओल्या व सुक्या अशा दोन्ही प्रकारच्या भाज्या तयार कराव्या लागतात. या भाज्यांमध्ये लाल भोपळा, भेंडी, अळू, गवार, बटाटा, कारलं, मेथी अशा अनेक भाज्या असतात. एकाचवेळी या इतक्या भाज्या करुन इतर स्वयंपाक देखील करायचा म्हटल्यावर खूप मेहेनत आणि वेळ लागतो. अशावेळी हा स्वयंपाक तयार करताना जर बेसिक तयारी आणि लागणारे साहित्य जर आधीच तयार करुन ठेवले तर आयत्यावेळी घाईगडबड होत नाही. पितृपक्षाचा स्वयंपाक करताना वेगवेगळ्या भाज्या तयार करण्यासाठी एकाच प्रकारचे वाटण तयार करुन ठेवले तर स्वयंपाक लगेच तयार करता येतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या तयार करण्यासाठी एकाच प्रकारचे वाटण तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात(Pitrupaksh Recipe Quick & Tasty Vegetable Masala for Different Type Of Sbzi)
साहित्य :-
१. हिरव्या मिरच्या - ६ ते ७ मिरच्या २. आलं - २ ते ३ टेबलस्पून ३. जिरे - ३ टेबलस्पून
भाज्या लवकर शिळ्या - खराब होऊ नयेत म्हणून पाहा सोपी पद्धत, आठवडाभर भाज्या राहतील एकदम फ्रेश...
कृती :-
१. सगळ्यांत आधी हिरव्या मिरच्या घेऊन त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. २. आता मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, आल्याचे तुकडे, जिरे असे सगळे जिन्नस घालून मिक्सरला हे सगळे जिन्नस वाटून घ्यावेत. ३. हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याची जाडसर अशी भरड करून भाज्यांसाठीचे वाटण तयार करुन घ्यावेत.
पितृपक्षात करतात तशी पारंपरिक तांदुळाची खीर करण्याची सोपी रेसिपी, खीर होईल परफेक्ट - चवीला उत्तम...
या वाटणाचा वापर करुन भाज्या कशा कराव्यात ?
हे तयार वाटण वापरुन आपण भेंडी, भोपळा, मेथी, बटाटा, गवार, मेथी, कारलं या भाज्या झटपट तयार करु शकतो. यासाठी एका मोठ्या कढईत तेल घेऊन त्यात गरजेनुसार जिरे, मोहरी फोडणीला घालून मग हे तयार वाटण घालावे. त्यानंतर यात भाज्या घालूंन त्या व्यवस्थित शिजवून घ्याव्यात. अशाप्रकारे पितृपक्षात स्वयंपाक करताना वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कराव्या लागतात. अशावेळी एकाच प्रकारचे वाटण वापरुन आपण या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या अगदी झटपट तयार करु शकतो. यामुळे स्वयंपाक करताना जास्त वेळही लागणार नाही आणि भाज्या चवीला देखील अगदी टेस्टी लागतील.