Lokmat Sakhi >Food > पितृपक्ष: आमसुलाची चटणी खूप उरली तर ३ प्रकारे वापरा, वायाही जाणार नाही- स्वयंपाक होईल चविष्ट..

पितृपक्ष: आमसुलाची चटणी खूप उरली तर ३ प्रकारे वापरा, वायाही जाणार नाही- स्वयंपाक होईल चविष्ट..

Pitrupaksha Aamsul kokam Chutney uses : उरलेल्या चटणीचा करा स्मार्ट वापर, आमसूल आरोग्यासाठी फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2024 04:01 PM2024-09-25T16:01:49+5:302024-09-25T16:39:26+5:30

Pitrupaksha Aamsul kokam Chutney uses : उरलेल्या चटणीचा करा स्मार्ट वापर, आमसूल आरोग्यासाठी फायदेशीर...

Pitrupaksha Aamsul kokam Chutney uses : Use the remaining amsool chutney of Pitrupaksha in 3 ways, it will not be wasted - the cooking will be delicious.. | पितृपक्ष: आमसुलाची चटणी खूप उरली तर ३ प्रकारे वापरा, वायाही जाणार नाही- स्वयंपाक होईल चविष्ट..

पितृपक्ष: आमसुलाची चटणी खूप उरली तर ३ प्रकारे वापरा, वायाही जाणार नाही- स्वयंपाक होईल चविष्ट..

पितृपक्षाच्या नैवेद्यात तांदळाची खीर, भाजणीचे वडे, कढी यांच्याबरोबरच आणखी एक पदार्थ आवर्जून केला जातो तो म्हणजे आमसूलाची चटणी. आंबटगोड चवीची ही चटणी नैवेद्यासाठी केलेली असल्याने ती पानात आवर्जून वाढली जाते. आमसूल आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असल्याने ती चटणी अवश्य खायला हवी. पण सगळेच जण ही चटणी आवडीने खातात असे नाही.

मग पहिल्यांदा वाढल्यानंतर पुन्हा फारसे कोणी ती घेत नाही. अशावेळी ही आमसूलाची चटणी उरतेच उरते. मग इतकी मोठी चटणी खाल्लीही जात नाही. मग ती वाया घालवण्यापेक्षा त्याचा स्वयंपाकात वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. म्हणजे नेमकं काय करायचं ते आज आपण पाहणार आहोत (Pitrupaksha Aamsul kokam Chutney uses). 

१. आमसूल सार

एरवी आपण आमसूलाचे सार करतो. पावसाळ्याच्या दिवसांत हवेत गारठा असताना गरमागरम सार अतिशय छान लागते. यासाठी जीरे, लसूण, कोथिंबीर यांचे वाटण करुन ते या चटणीत घालावे. पाणी घालून सगळे चांगले एकजीव करुन घ्यावे आणि आवडीप्रमाणे वरुन तेलाची किंवा तूपाची फोडणी करुन हे सार प्यावे. हे सार नुसते तर चांगले लागतेच पण पुलाव, दलिया यांच्यासोबतही हे सार फारच छान लागते.  

२. भाजी-आमटीचा स्वाद वाढवण्यासाठी

अनेकदा आपण भाजी- आमटीला थोडी आंबट-गोड चव येण्यासाठी चिचं, लिंबू, टोमॅटो, आमसूल असे काही ना काही घालतो.पण ही चटणी राहीलेली असेल तर भाजीच्या वाटणात किंवा आमटीला आपण चमचाभर चटणी घालू शकतो. त्यामुळे पदार्थाचा स्वाद वाढण्यास मदत होते. 

३. सरबत

एरवी आपण कोकम सरबत करतो. त्याचप्रकारे या चटणीमध्ये पाणी आणि थोडी साखर, जीरेपूड घालून त्याचे आपण छान सरबत करु शकतो. मात्र यासाठी चटणी आणि पाणी नीट एकजीव करुन घेणे आवश्यक असते. आवडीप्रमाणे यामध्ये पुदीना, कोथिंबीर घातली तरीही ते प्यायला छान लागते. उन्हातून आल्यावर असे सरबत प्यायल्यास झटपट एनर्जी मिळण्यास मदत होईल. 

Web Title: Pitrupaksha Aamsul kokam Chutney uses : Use the remaining amsool chutney of Pitrupaksha in 3 ways, it will not be wasted - the cooking will be delicious..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.