Lokmat Sakhi >Food > वाटली डाळ गचका होते- छातीत बसते? 'ही' रेसिपी ट्राय करा! डाळ होईल मोकळी, चटपटीत

वाटली डाळ गचका होते- छातीत बसते? 'ही' रेसिपी ट्राय करा! डाळ होईल मोकळी, चटपटीत

Pitru paksha Special Recipe: पितृपक्षाच्या स्वयंपाकात वाटली डाळ केलीच जाते (Pitru paksha 2024). बघा त्याच डाळीची ही एकदम सोपी रेसिपी (how to make vatli dal?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2024 02:46 PM2024-09-18T14:46:54+5:302024-09-18T14:48:24+5:30

Pitru paksha Special Recipe: पितृपक्षाच्या स्वयंपाकात वाटली डाळ केलीच जाते (Pitru paksha 2024). बघा त्याच डाळीची ही एकदम सोपी रेसिपी (how to make vatli dal?)

pitrupaksha special recipe, how to make vatli dal, vatli dal recipe in marathi  | वाटली डाळ गचका होते- छातीत बसते? 'ही' रेसिपी ट्राय करा! डाळ होईल मोकळी, चटपटीत

वाटली डाळ गचका होते- छातीत बसते? 'ही' रेसिपी ट्राय करा! डाळ होईल मोकळी, चटपटीत

Highlights आंबट, गोड, तिखट अशा अगदी परफेक्ट चवीची वाटली डाळ कशी करावी, यासाठी ही रेसिपी ट्राय करून पाहा.

वाटली डाळ हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. अनेक भागात गणेश विसर्जनाच्या दिवशी वाटली डाळ केली जाते. काही ठिकाणी पितृपक्षाचा जो स्वयंपाक असतो, त्या स्वयंपाकात वाटली डाळ हमखास असतेच (Pitru paksha Special Recipe). खमंग चटपटीत वाटली डाळ तशी बहुतांश जणांना आवडतेच. पण नेमकं होतं असं की एकतर ही डाळ खूपच काेरडी होते आणि खाताना छातीत बसते किंवा मग खूपच गचका होऊन जाते (how to make vatli dal?). असं होऊ नये आणि आंबट, गोड, तिखट अशा अगदी परफेक्ट चवीची वाटली डाळ कशी करावी, यासाठी ही रेसिपी ट्राय करून पाहा. (vatli dal recipe in Marathi)

 

वाटली डाळ करण्याची रेसिपी

वाटली डाळ करण्याची रेसिपी MadhurasRecipe Marathi या यु- ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

अर्धा कप हरबरा डाळ

१ हिरवी मिरची

डाएटिशियन सांगतात नाश्त्यामध्ये ४ पदार्थ मुळीच खाऊ नये- वजन आणि शुगर भराभर वाढेल

अर्धा इंच आल्याचा तुकडा

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे, कडिपत्ता

चवीपुरतं मीठ

बारीक चिरलेली कोथिंबीर

लिंबू 

१ टीस्पून साखर 

 

कृती

हरबऱ्याची डाळ एका भांड्यात घ्याआणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती ४ तासांसाठी भिजत घाला.

यानंतर मिरची, आलं आणि भिजवलेली डाळ मिक्सरमधून जाडीभरडी वाटून घ्या. डाळीतलं पाणी मिक्सरमध्ये अजिबात जायला नको.

ब्रेस्ट कॅन्सरची ट्रिटमेंट सुरु असतानाही हिना खान करतेय कसून व्यायाम, ते पाहूनच चाहते म्हणाले...

यानंतर कुकरमध्ये ही डाळ १ शिट्टी करून वाफवून घ्या. डाळ वाफवून घेताना तिच्यावर झाकण ठेवा..

यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर तेल, मोहरी, जिरे, कडिपत्ता, सुकी लाल मिरची, हिंग आणि हळद घालून फोडणी करून घ्या. 

फोडणी करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेली डाळ थोडी मोकळी करून टाका आणि चवीनुसार मीठ घालून परतून घ्या. 

डाळ व्यवस्थित मोकळी झाली की कढईवर झाकण ठेवा आण ५ ते ६ मिनिटे वाफवून घ्या. यानंतर डाळीमध्ये लिंबू पिळा आणि थोडीशी साखर घाला. यानंतर पुन्हा १- २ मिनिटे डाळ चांगली परतून घ्या आणि त्यानंतर गॅस बंद करून टाका. खमंग, खुसखुशीत वाटली डाळ झाली तयार.. यंदा पितृपक्षात या रेसिपीने वाटली डाळ करून पाहा.. 

 

Web Title: pitrupaksha special recipe, how to make vatli dal, vatli dal recipe in marathi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.