पितृपंधरवड्याला सुरुवात झाली आहे. पितृपंधरवड्यात स्वयंपाक करायचा म्हटलं की खीर आणि वडे, पुरी असे काही पदार्थ हे करावेच लागतात. या जेवणाच्या पानांत खिरीचे एक वेगळेच स्थान असते. खिरीशिवाय हे जेवण अपूर्णच आहे. पितरांना जेवणाचे पान अर्पण करताना त्यात तांदुळाची खीर आवर्जून ठेवावी लागतेच. पितरांच्या आठवणीत या दिवशी त्यांना नैवेद्य म्हणून पारंपरिक पद्धतीचा स्वयंपाक केला जातो. हा पारंपरिक पद्धतीचा स्वयंपाक करताना तांदुळाची खीर देखील केली जाते(How To Make Tndulachi Kheer).
पितरांना तृप्त करण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात अनेक नवनवीन प्रकारच्या खीर केल्या जातात. काही भागात दुधाची, गव्हाची तर काही ठिकाणी तांदुळाची खीर केली जाते. पितृपक्षात घरोघरी प्रसाद म्ह्णून खीर केली जाते. साखर, तूप, ड्राय फ्रुटस, तांदूळ असे अनेक पदार्थ वापरुन ही खीर तयार केली जाते. पितृपक्षात खास केली जाणारी ही तांदुळाची खीर तयार करण्याची सोपी पारंपरिक रेसिपी पाहुयात(Pitrupaksha Special Rice Kheer Recipe).
साहित्य :-
१. दुध - १ लिटर
२. तांदुळ - ३ टेबलस्पून
३. खसखस - १ टेबलस्पून
४. सुकं खोबरं - १/४ कप
५. काजू - बदाम काप - ४ ते ५ टेबलस्पून
६. तूप - १ टेबलस्पून
७. वेलची पावडर - १/२ टेबलस्पून
८. केसर - ६ ते ८ काड्या
९. पाणी - १/४ कप
फक्त १ कप सीताफळाचा गर वापरून १० मिनिटांत करा सीताफळ फ्रुट क्रिम, मुलांसाठी खास पदार्थ...
भाजीसाठी ग्रेव्ही करताना दही घालणार असाल तर ८ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर भाजी नासेल-चव बिघडेल....
कृती :-
१. सगळ्यांत आधी एक कढई घेऊन ती व्यवस्थित गरम करुन घ्यावी. त्यानंतर त्या कढईत थोडेसे तांदूळ घालून ते हलके गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यावेत.
२. तांदूळ कोरडे भाजून झाल्यानंतर त्यातच खसखस भाजून घ्यावी. त्यानंतर खवलेल सुकं खोबरं देखील हलकेच भाजून घ्यावे. आता हे भाजलेले सगळे जिन्नस एका बाऊलमध्ये काढून त्यात थोडेसे पाणी घालूंन घ्यावे. पाणी घातल्यानंतर त्यात ५ ते ६ काजूचे तुकडे घालावेत. हे सगळे मिश्रण पाण्यांत तसेच थोडा वेळ भिजत ठेवावेत.
३. आता कढईत थोडेसे तूप घेऊन त्यात काजू - बदाम किंवा आपल्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सचे काप हलकेच परतून घ्यावेत. त्यानंतर आता कढईत दूध घालून ते दूध व्यवस्थित गरम करून घ्यावे.
इडलीच्या पिठाचे करा खमंग - खुसखुशीत बटाटेवडे फक्त १० मिनिटांत! पाहा साधीसोपी भन्नाट रेसिपी...
४. आता आपण जे सगळे जिन्नस भाजून घेऊन ते पाण्यात भिजत ठेवले होते ते सगळे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची एकदम पातळ पेस्ट तयार करुन घ्यावी. ही मिक्सरमधील तयार झालेली पेस्ट गॅसवर ठेवलेल्या गरम दुधात घालावी आणि सगळे जिन्नस एकत्रित मिक्स करुन घ्यावेत. त्यानंतर ही खीर मंद आचेवर चांगली शिजवून घ्यावी.
५. खीर अर्धी शिजत आली की यात वेलची पावडर, केसर, ड्राय फ्रुटसचे काप घालून खीर पुन्हा शिजण्यासाठी ठेवून द्यावी. ५ ते १० मिनिटानंतर खीर थोडीशी दाटसर होऊ लागेल. खीर थोडी दाटसर होत आली की गॅस बंद करावा.
अशाप्रकारे आपली तांदुळाची खीर खाण्यासाठी तयार आहे.