Lokmat Sakhi >Food > पितृपंधरवडा : पितरांच्या नैवेद्यासाठी करा भरड्याचे वडे; पारंपरिक पौष्टिक भरड वड्याची झटपट रेसिपी

पितृपंधरवडा : पितरांच्या नैवेद्यासाठी करा भरड्याचे वडे; पारंपरिक पौष्टिक भरड वड्याची झटपट रेसिपी

Pitrupandhrawada pitru paksh Special Bharda wade Authentic Recipe for Naivedya : वर्षभर कधीच केले न जाणारे हे वडे या दिवशी मात्र आवर्जून केले जातात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2023 05:34 PM2023-10-03T17:34:11+5:302023-10-05T15:35:50+5:30

Pitrupandhrawada pitru paksh Special Bharda wade Authentic Recipe for Naivedya : वर्षभर कधीच केले न जाणारे हे वडे या दिवशी मात्र आवर्जून केले जातात.

Pitrupandhrawada pitru paksh Special Bharda wade Authentic Recipe for Naivedya Pithripandharvada Special: Perfect Traditional Bharda Vade for Offering; Get the easy recipe | पितृपंधरवडा : पितरांच्या नैवेद्यासाठी करा भरड्याचे वडे; पारंपरिक पौष्टिक भरड वड्याची झटपट रेसिपी

पितृपंधरवडा : पितरांच्या नैवेद्यासाठी करा भरड्याचे वडे; पारंपरिक पौष्टिक भरड वड्याची झटपट रेसिपी

पितृपंधरवडा म्हणजे कुटुंबातील गेलेल्या व्यक्तींना स्मरण करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा दिवस. या काळात जास्तीत जास्त अन्नदान किंवा इतर प्रकारचे दान केल्यास गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यास सद्गती मिळते तसेच आपल्यालाही त्याचे पुण्य मिळते असे म्हणतात. म्हणूनच या काळात पितरांची पूजा करुन ब्राम्हणांना आणि आपल्या परीवारातील लोकांना जेवायला बोलवण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. विशिष्ट सणाला किंवा कार्याला आपण ज्याप्रमाणे विशिष्ट स्वयंपाक करतो. त्याचप्रमाणे श्राद्धकर्मातही ठरलेल्या पदार्थांचाच भोजनात समावेश करावा लागतो. तांदळाची खीर, आमसूलाची चटणी, ठराविक भाज्या यांप्रमाणेच या नैवेद्यात वड्यांना विशेष महत्त्व असते. वर्षभर कधीच केले न जाणारे हे वडे या दिवशी मात्र आवर्जून केले जातात. भरड्याचे वडे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वड्यांचा भरडाही शक्यतो घरीच केला जातो. पारंपरिक पद्धतीने केला जाणारा हा भरडा आणि वडे करण्याची परफेक्ट पद्धत समजून घेण्यासाठी ही रेसिपी कशी करायची पाहूयात (Pitrupandhrawada pitru paksh Special Bharda wade Authentic Recipe for Naivedya)...


साहित्य - 

१. तांदूळ - १ भांडे 

२. हरभरा डाळ - पाव भांडे

३. उडीद डाळ - पाव भांडे

४. धणे - पाव भांडे

५. जीरे - २ चमचे

(Image : Google )
(Image : Google )

६. मेथ्या - अर्धा चमचा 

७. हिंग - पाव चमचा

८. हळद - अर्धा चमचा

९. तिखट - अर्धा चमचा 

१०. मीठ - चवीनुसार 

११. तीळ - २ चमचे 

१२. कोथिंबीर - अर्धी वाटी - बारीक चिरलेली

१३. तेल - २ वाट्या

कृती - 

१. तांदूळ स्वच्छ धुवून त्यातले सगळे पाणी काढून घ्या आणि अर्धा तास पंख्याखाली एका कापडावर पसरुन ठेवा.

२. हरभरा डाळ, उडीद डाळ, धणे, जीरे आणि मेथ्या सगळे एकत्र करुन घ्या.

३. कढई पूर्ण तापवून गॅस बंद करायचा आणि यामध्ये अर्धा तास वाळलेले तांदूळ घालून ते चांगले परतून घ्यायचे. 

४. तांदूळ पूर्ण गरम झाल्यानंतर त्यामध्ये डाळींचे एकत्र केलेले मिश्रण घालायचे आणि सगळे पुन्हा चांगले हलवून कढई गार होईपर्यंत सगळ्या गोष्टी एकत्र भाजून घ्यायच्या.

५. आता हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये घालून बारीक करुन घ्यावे. एकदम बारीक पावडर न करता थोडी जाडसर पावडर करा.

६. हा भरडा एका परातीत घेऊन त्यामध्ये तिखट, हळद, हिंग, मीठ, तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घट्टसर पीठ मळून घ्यावे.

७. पीठ मळताना साध्या पाण्याचा वापर न करता पूर्ण गरम पाणी वापरावे.

८. मळलेल्या पीठाचे लहान गोळे करुन ते प्लास्टीकच्या कागदावर तेल लावून हाताने थापावेत.

९. गॅसवर कढईत तेल घालून ते चांगले तापू द्यावे आणि वडे त्यात लालसर होईपर्यंत दोन्ही बाजूने चांगले खरपूस तळून घ्यावेत. 

Web Title: Pitrupandhrawada pitru paksh Special Bharda wade Authentic Recipe for Naivedya Pithripandharvada Special: Perfect Traditional Bharda Vade for Offering; Get the easy recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.