Join us

आरोग्यासाठी वरदान आहे शेवगा, नियमित खा पौष्टिक शेवगा पराठा- प्रतिकारशक्ती वाढेल भरपूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2023 22:13 IST

How To Make Drumsticks Paratha : शेवग्याचा पराठा करायला अगदी सोपा आणि पौष्टिक असतो....

शेवग्याची सध्या सर्वत्रच चर्चा आहे. शेवगा आरोग्यासाठी अमृत मानला जातो. आणि सध्या तर शेवग्याच्या पराठ्याचीही खास चर्चा आहे. दोन वर्षांपूर्वी फिट इंडिया मोहिमेनिमत्ताने बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi's Favorite Moringa Paratha) यांनीही आपण शेवग्याची पराठे खातो असे आवर्जुुन सांगितले होते. अजूनही तो व्हिडिओ व्हायरल होत असतो. पौष्टिक खाणाऱ्यांसाठी शेवगा हे खरोखरच वरदान आहे(Drumsticks paratha recipe).

शेवग्याच्या शेंगा, पाला, बिया हे सर्वच आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. शेवग्याच्या शेंगाचा वापर रोजच्या जेवणात केल्यास आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. शेवग्याच्या शेंगांना सुपरफूडही (Try these moringa parathas that PM Modi loves) म्हटले जाते. शेवग्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमीनो ॲसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शियम, फायबर, सोडियम यासह इतर पौष्टीक घटक आढळतात. फक्त शेंगाच नाही तर, त्याच्या पानात देखील अनेक पौष्टीक घटक देखील असतात. शेवग्याचा पराठा हा एक उत्तम चविष्ट पौष्टिक पदार्थ आपणही करु शकतो(How to make Modi's favourite Moringa Paratha).

शेवग्याच्या शेंगांचा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. शेवग्याच्या शेंगा - १ मोठा बाऊल २. मीठ - चवीनुसार३. हळद - १/२ टेबलस्पून४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून५. धणेपूड - १ टेबलस्पून६. जिरेपूड - १ टेबलस्पून७. आमचूर पावडर - १ टेबलस्पून८. हिंग - १/२ टेबलस्पून९. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून१०. हिरव्या मिरचीचा ठेचा - १ टेबलस्पून११. पांढरे तीळ - १ टेबलस्पून१२. कोथिंबीर - १ टेबलस्पून१३. गव्हाचे पीठ - १ कप१४. तेल - २ ते ३ टेबलस्पून

विदर्भ स्पेशल : ताज्या वाटणातला वांगी भात, ‘असा’ मस्त मसालेदार वांगी भात करा, पोटभर जेवा-पोळीभाजीची गरजच नाही !

कृती :- 

१. सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून घ्याव्यात. २. आता या सोललेल्या शेंगा कुकर मध्ये पाणी घालून व्यवस्थित उकडवून घ्याव्यात. ३. शेंगा उकडवून घेतल्यानंतर त्या एका गाळणीत काढून मॅश करुन त्याचा रस काढून घ्यावा. 

शेफ कुणाल कपूर सांगतो ढाब्यावर मिळतो तसा परफेक्ट क्रिस्पी पराठा होण्यासाठी ६ टिप्स...

थालीपीठाची भाजणी संपली ? भाजणी शिवाय बनवा अगदी १० मिनिटांत कारवार स्पेशल रवा थालीपीठ....

४. या शेंगांच्या रसात चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट मसाला, धणेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर, हिंग, आलं - लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचा ठेचा, पांढरे तीळ, कोथिंबीर, गव्हाचे पीठ, तेल घालून पराठ्याचे पीठ मळून घ्यावे. ५. या मळलेल्या पिठाचे गोळे करुन त्याचे पराठे लाटून घ्यावेत. ६. हे पराठे तेलावर दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावेत. 

अस्सल कर्नाटकी मधुर वडा करण्याची पारंपरिक रेसिपी, असा खुसखुशीत वडा आणि सोबत चहा हवा...

शेवग्याच्या शेंगांचे हेल्दी पराठे खाण्यासाठी तयार आहेत. हे गरमागरम पराठे हिरव्या चटणी किंवा सॉससोबत छान लागतात.

टॅग्स :अन्नपाककृती