Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात इडलीचं पीठ फुलत नाही? १ सोपी ट्रिक, इडल्या होतील मऊ-लुसलुशित

पावसाळ्यात इडलीचं पीठ फुलत नाही? १ सोपी ट्रिक, इडल्या होतील मऊ-लुसलुशित

Podi Idli Recipe : पावसाळ्यात इडलीचं पीठ फुलत नाही अशी तक्रार अनेकजणी करतात. इडली, डोश्याचं पीठ फुलवण्यासाठी तुम्ही सोप्या घरगुती ट्रिक्स वापरू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 08:38 AM2023-07-21T08:38:00+5:302023-07-21T13:15:36+5:30

Podi Idli Recipe : पावसाळ्यात इडलीचं पीठ फुलत नाही अशी तक्रार अनेकजणी करतात. इडली, डोश्याचं पीठ फुलवण्यासाठी तुम्ही सोप्या घरगुती ट्रिक्स वापरू शकता.

Podi Idli Recipe : Podi idli how to make idli batter fluffy how to make soft idli basic tips | पावसाळ्यात इडलीचं पीठ फुलत नाही? १ सोपी ट्रिक, इडल्या होतील मऊ-लुसलुशित

पावसाळ्यात इडलीचं पीठ फुलत नाही? १ सोपी ट्रिक, इडल्या होतील मऊ-लुसलुशित

पावसाळ्यात भूक खवळते आणि चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी घरातले नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आला की बाहेची इडली, डोसा, मेदूवडा असे पदार्थ खावेसे वाटतात. बाहेरचे पदार्थ कोणत्या तेलात तळले जातात याची कल्पना नसते, खोकला, फूड पॉयजनिंग टाळण्यासाठी बाहेरचं खाणं टाळलेलंच बरं.... तुम्हालाही काहीतरी नवीन खाण्याची इच्छा झाली असेल तर नाश्त्याला खाण्यासाठी तुम्ही पोडी इडली ही पारंपारीक पदार्थ ट्राय करू शकता. (Idli Recipe) पावसाळ्यात इडलीचं पीठ फुलत नाही अशी तक्रार अनेकजणी करतात. इडली, डोश्याचं पीठ फुलवण्यासाठी तुम्ही सोप्या घरगुती ट्रिक्स वापरू शकता. (How to make idli batter fluffy)

सॉफ्ट, फुललेल्या इडल्या कशा बनवाव्यात (How to make podi idli how to make idli batter fluffy)

1) इडलीचं पीठ बनवण्यासाठी एक वाटी उडीद डाळ आणि दोन कप तांदूळ १२ तास भिजत ठेवा. त्यात दोन चमचे मेथीचे दाणेही घाला. त्यानंतर ग्राइंडरमध्ये तांदूळ आणि डाळ व्यवस्थित बारीक करून घ्या.  जर तुम्ही साल असलेल्या उडीदाची डाळ वापरत असाल तर धुताना साल काढून मग डाळ वाटून घ्या. (Podi Idli Recipe)

2) तांदूळ आणि डाळ दोन्ही मिक्सरमध्ये एकदम जास्त बारीक न करतात थोडे थोडे बारीक करून घ्या म्हणजे टेक्चर चांगले राहील. दळताना कमीतकमी पाणी घाला. यानंतर मीठ आणि बेकींग सोडा घालून बॅटर व्यवस्थित फेटून घ्या.  पीठ आंबवण्यासाठी १२ तास बाजूला ठेवा. पीठ व्यवस्थित आंबल्यानंतर इडलीच्या साच्यात इडलीचे पीठ घाला.आणि 20 ते 30 मिनिटे वाफेवर शिजवा. (How to Make Soft Idli with Basic Tips) 

पोडी इडलीचे साहित्य

पाव वाटी शेंगदाणे

८ ते १० लहान इडल्या

२ ते ३ टिस्पून चणा डाळ

३ टिस्पून उडीद डाळ

२-३ लाल मिरच्या 

२ टिस्पून तीळ

अर्ध सुकं खोबरे (बारीक किसलेलं)

२ टिस्पून जिरं

६ ते ७ कढीपत्ता पानं

चवीनुसार मीठ

गरजेनुसार तूप

कृती

1) सर्व प्रथम एका पातेल्यात शेंगदाणे, सुक्या लाल मिरच्या, चणा डाळ, उडीद डाळ, तीळ, खोबरं, जिरे आणि कढीपत्ता भाजून घ्या. 

2) चांगले भाजल्यानंतर ब्लेंडरमध्ये मीठ घालून बारीक करा आणि पोडी मसाला तयार करा.

3) दुसरी कढई घ्या आणि त्यात तूप गरम करा आणि फोडणी द्या.

4) आता त्या कढईत इडली टाकून हलके तळून घ्या. त्यानंतर  मसाला घालून इडली व्यवस्थित फ्राय करून घ्या. 

Web Title: Podi Idli Recipe : Podi idli how to make idli batter fluffy how to make soft idli basic tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.