नाश्त्याला किंवा चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत, खमंग खाण्याची इच्छा झाली की नेहमी बाहेरून आणणलेले स्नॅक्स (Snacks), बिस्किट्स खाल्ले जतात पण तुम्हाला घरी बनवलेले खमंग पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही पोह्यांची चकली खमंग चकली खाऊ शकता. (Cooking Hacks) पोह्याची चकली (Poha Chakali Recipe) करायला अगदी सोपी असते. यासाठी आधी भाजणी वगैरे काही तयार करावी लागत नाही. मधल्यावेळेत खाण्यासाठी किंवा मुलांना खाऊच्या डब्यात देण्यासाठी तुम्ही ही चकली करू शकता. (How to make poha Chakali at home)
पोह्यांची चकली करण्यासाठी लागणारं साहित्य (Instant Poha Chakali Making Process)
१) १ कप- पोहे
२) अर्धा कप- डाळवे
३) १ ते दीड कप- तांदळाचे पीठ
४) तळण्यासाठी- तेल
५) १ टेबलस्पून- लाल तिखट
६) १ टेबलस्पून - धणे पावडर
७) १ टिस्पून- हळद
८) अर्धा टिस्पून- जीरेपूड
९) पाव टिस्पून- हिंग
१०) अर्धा टिस्पून- ओवा
११) २ टिस्पून- तीळ
१२) चवीपुरता - मीठ
१३) गरजेनुसार- पाणी
पोह्यांची इस्टंट चकली कशी करायची (Instant Poha Chakali Recipe in Marathi)
१) पोह्यांची चकली करण्यासाठी सगळ्यात आधी वाटीभर पोहे आणि भाजलेली चण्याची डाळ मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्या.
२) बारीक झाल्यानंतर याची पावडर एका परातीत गाळून घ्या. त्यात तांदूळाचे पीठ आणि सर्व मसाले घालून एकजीव करून घ्या.
३) त्यात तीळ, जीरं घालून तेलाचे मोहन घाला आणि सर्व जिन्नस एकजीव करा. १० मिनिटं झाकून ठेवल्यानंतर झाकण काढा. पीठात थोडं थोडं पाणी घालून पीठाचा छान गोळे तयार करून घ्या.
रोजची जेवणाची वेळ फिक्स नसते? 'या' वेळेत जेवा; कधीच जीवघेणा हार्ट अटॅक येणार नाही-रिसर्च
४) चकलीच्या सोऱ्यात बसेल इतकं पीठ घेऊन लांबट आकार देऊन साच्यात भरा. तयार पीठाच्या चकल्या करून घ्या. तेल गरम झाले की एकामागोमाग एक चकल्या घालून तळून घ्या.
५) चकली पूर्णपणे बुडेल इतकं तेल कढईत असावं. चकली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. ही चकली तुम्ही १५ दिवस ते महिनाभर खाऊ शकता.