Lokmat Sakhi >Food > पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा करा कमी तेलात, पावसाळ्यातही पोहे आकसणार-सादळणार नाहीत

पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा करा कमी तेलात, पावसाळ्यातही पोहे आकसणार-सादळणार नाहीत

Poha Chivda Recipe : तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असााल पोह्याचा चिवडा हेउत्तम स्नॅक्स आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:59 AM2023-09-15T11:59:48+5:302023-09-15T18:55:56+5:30

Poha Chivda Recipe : तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असााल पोह्याचा चिवडा हेउत्तम स्नॅक्स आहे.

Poha Chivda Recipe : How to Make Less oily, Crispy Poha Chivda at home | पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा करा कमी तेलात, पावसाळ्यातही पोहे आकसणार-सादळणार नाहीत

पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा करा कमी तेलात, पावसाळ्यातही पोहे आकसणार-सादळणार नाहीत

मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी आणि चहाबरोबर खाण्यासाठी प्रत्येकालाच क्रिस्पी,  खमंग पदार्थ आवडतात. अशात नेहमीच बाहेरचं खाल्लं तर प्रकृतीला धोका उद्भवतो. खोकला,  घसादुखी, कफ असे त्रास उद्भवतात. घरच्याघरी अगदी कमी वेळात स्नॅक्स बनवायचे असेल तर तुम्ही पोह्यांचा चिवडा बनवू शकता. (How to make poha chivda) जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असााल पोह्याचा चिवडा हेउत्तम स्नॅक्स आहे. यात कमी कॅलरीज असतात आणि कमी तेलकट असल्यामुळे पोट जास्तवेळ भरलेलं राहतं. (Poha Chivda Recipe)

साहित्य

भाजलेले पोहे-  २ कप

शेंगदाणे- १ वाटी

चणा डाळ - अर्धी वाटी

कढीपत्ता- १० ते १५ पानं

बारीक चिरलेल्या मिरच्या -३ ते ४

मोहोरी- १ चमचा

हळद- १ चमचा

गरम मसाला -१ चमचा

तीळ - १ चमचा

पिठीसाखर- २ चमचे

मीठ- चवीनुसार

तेल- गरजेनुसार

कृती

१) एक कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात पातळ पोहे घाला. पोहे व्यवस्थित कडक होईपर्यंत भाजून घ्या. पोहे हाताने तुटू लागले की समजा पोहे व्यवस्थित भाजले गेले आहेत. जर तुम्ही पोहे व्यवस्थित भाजले नाही तर आकसू लागतात.

२) नंतर पोहे  एका मोठ्या भांड्यात काढून घ्या. कढईत तेल घालून कच्चे शेंगदाणे तळून घ्या. त्यानंतर चण्याची डाळ तळून घ्या. 

३) बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, जीरं, तीळ, हळद, गरम मसाला, मीठ घालून एकजीव करा. त्यात तळलेले शेंगदाणे,  चण्याची डाळ घाला. नंतर भाजलेले पोहे घालून एकजीव करा. पोहे कुरकुरीत होईपर्यंत छान परतून घ्या. वरून  पिठी साखर घाला. तयार आहे खमंग पोह्यांचा चिवडा.

पोह्याचा चिवडा खाण्याचे फायदे

१) हा चिवडा खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म चांगले राहतो.  यातील फायबर पचनतंत्र व्यवस्थित ठेवते आणि अन्न पचण्यास मदत होते.

बारीक होण्यासाठी रोज नाश्त्याला काय खायचं? तज्ज्ञ सांगतात स्लिम-फिट फिगरचं सोपं सिक्रेट

२) हा चिवडा खाल्ल्यास रक्ताची कमतरता दूर होते. एनिमिया असलेल्या व्यक्तीने आहारात या चिवड्याचा समावेश करावा.

३) पोह्यांचा चिवडा खायला हलका असला तरी खाल्ल्यानंतर पोट बराचवेळ भरलेलं राहतं. यामुळे ओव्हर इटींग टळतं आणि वजनही नियंत्रणात राहतं. 

Web Title: Poha Chivda Recipe : How to Make Less oily, Crispy Poha Chivda at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.