Join us  

झटपट करा पोह्यांची इडली! डाळ तांदूळ भिजवून वाटण्याची कटकटच नाही- बघा चवदार रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2024 4:07 PM

Poha Idli Recipe: इडली खाण्याची इच्छा झाली तर लगेच ही चवदार इन्स्टंट इडली करून खा. मुलांना डब्यात देण्यासाठी, नाश्त्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. (simple and easy recipe of making poha idli)

ठळक मुद्देडाळ- तांदूळ भिजत घाला ते मिक्सरमधून वाटून घ्या, अशी काही कटकट करण्याची गरजच नाही.

इडली हा बहुतांश लोकांचा एक आवडीचा पदार्थ. बरेच इडलीप्रेमी तर असेही आहेत की ते सकाळी नाश्त्याला तर इडली खातातच पण रात्रीच्या जेवणातही इडली सांबार पोटभर असेल तरी त्यांना चालतो. लहान मुलांनाही इडली अतिशय प्रिय असते. डब्यात मऊ लुसलुशीत इडल्या पाहिल्या की मुलांची कळी आपोआपच खुलते. म्हणूनच सकाळच्या धावपळीत मुलांना डब्यात देण्यासाठी एक सोपा आणि चवदार पदार्थ करायचा असेल तर ही पोह्यांची इडली एकदा ट्राय करून बघा (how to make instant idli?).  इडली करण्याची पद्धत एवढी सोपी आहे (poha idli recipe) की तिच्यासाठी डाळ- तांदूळ भिजत घाला ते मिक्सरमधून वाटून घ्या, अशी काही कटकट करण्याची गरजच नाही. (simple and easy recipe of making poha idli)

पोह्यांची इडली करण्याची रेसिपी 

साहित्य 

१ वाटी पोहे

१ वाटी रवा

कम्प्युटरवर काम करून मान- खांदे दुखतात? श्री. श्री. रविशंकर सांगतात ५ मिनिटांचा व्यायाम, पटकन आराम मिळेल 

१ चमचा इनो

एका लिंबाचा रस

१ मध्यम आकाराचा किसून घेतलेला कांदा

१ टीस्पून लसूण पेस्ट 

 

कृती 

सगळ्यात आधी तर पोहे आणि रवा एकत्र करा आणि ते मिक्सरमधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्या. 

त्यानंतर लसूण आणि कांदा मिक्सरमध्ये घालून त्यांचीही प्युरी करून घ्या. 

स्क्रिनवर सतत काम करून डोळ्यांवर ताण येतो? २०-२०-२० चा फॉर्म्युला वापरा- डोळ्यांना आराम मिळेल

रवा- पोह्याचे पीठ, कांद्याची प्युरी एका भांड्यात एकत्र करा. पाणी टाकून हे मिश्रण हलवा. त्यात लिंबाचा रस. मीठ घाला आणि सगळ्यात शेवटी इनो टाका. 

त्यानंतर हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवा. 

त्यानंतर नेहमीप्रमाणे इडलीपात्राला तेल लावून या पिठाच्या इडल्या करा.

इडल्या करताना गॅस मध्यम आचेवर ठेवा. खूप मोठा गॅस केला तर इडल्या कच्च्या राहू शकतात. नेहमीपेक्षा या इडल्या होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागेल.

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.