Join us  

ना डाळ - ना तांदूळ; कपभर पोह्याची करा मऊ - लुसलुशीत इडली; झटपट इडली करा १५ मिनिटांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2024 12:19 PM

Poha Idli Recipe | Instant Idli using Poha & Rava : काहीतरी हलकं खायचं असेल तर, पोह्याची इडली जरूर ट्राय करा.

सकाळचा नाश्ता असो किंवा रात्रीचं डिनर आपण हलके आणि पौष्टीक पदार्थ खाण्यास प्राधान्य देतो (Poha Idli). आरोग्याच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास रात्रीच्या वेळी जड जेवणाऐवजी हलके जेवण करावे (Cooking Tips). जर आपल्याला रात्रीच्या वेळेस हलके आणि पौष्टीक पदार्थ खायचं असेल तर, पोह्याची इडली करून खा (Kitchen Tips). पोहे इडली करायला सोपी आणि झटपट तयार होते (Instant Idli Recipe).

आपण कांदे पोहे, पोहे कटलेट्स किंवा पोह्याचा डोसा खाल्लाच असेल. आता पोह्याची इडली करून खा. आपण ही रेसिपी टिफिनसाठी, डिनर किंवा नाश्त्याला देखील खाऊ शकता. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, पोह्याची इडली करून खा. यासाठी आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. झटपट पोहे इडली तयार होतील. पण पोहे इडली कशी करायची? पाहूयात(Poha Idli Recipe | Instant Idli using Poha & Rava).

झटपट पोह्याची इडली कशी करायची?

लागणारं साहित्य

पोहे

रवा

दही

मीठ

जिरे

कपभर गव्हाच्या पीठाचे करा चमचमीत धिरडे; शाळेच्या डब्यासाठी बेस्ट पर्याय, १५ मिनिटांत चमचमीत पदार्थ

मोहरी

चिली फ्लेक्स

ओरेगॅनो

कृती

- पोहे इडली करण्यासाठी सर्वात आधी पोहे घ्या. त्यात पाणी घालून स्वच्छ धुवून घ्या. पोहे भिजल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या. त्यात रवा आणि दही घालून मिक्स करा. आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये देखील तयार करू शकता. जेणेकरून बॅटर छान गुळगुळीत तयार होईल.

कपभर रव्याचे करा कुरकुरीत वडे; पावसाळ्यात चहासोबत खाण्यासाठी पौष्टिक पदार्थ-शाळेच्या डब्यासाठीही उत्तम

- बॅटर छान गुळगुळीत तयार झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मिश्रण तयार झाल्यानंतर अर्धा तास बॅटरवर झाकण ठेवा.

- अर्धा तासानंतर इडली स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्राला ब्रशने तेल लावा. त्यात चमचाभर बॅटर ओता. इडली पात्र स्टीमरमध्ये ठेवा, व झाकण लावा. इडली वाफेवर १५ मिनिटांसाठी वाफवून घ्या. अशा प्रकारे पोह्याची इडली खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स