सकाळचा नाश्ता हा करायलाच हवा. पण नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळाही येतो (Poha Dhokla). भाजी - पोळी, पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ किंवा गुजराथी पदार्थ आपण नाश्त्याला खातोच (Breakfast Recipe). पण हेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर, पोह्याचा ढोकळा करून खा (Cooking Tips). नाश्त्याला पोहे आपण खातोच. शिवाय पोहे खाणे आरोग्यासाठी फायदेशीरही ठरते.
पण आपल्याला पोहे न खाता, वेगळं काहीतरी ट्राय करायचं असेल तर, पोह्याचा इन्स्टंट ढोकळा करून पाहा. बेसनाचा किंवा डाळ - तांदुळाचा ढोकळा आपण खातोच. पण विकेंडला नक्कीच पोह्यांचा ढोकळा करून खा. इन्स्टंट रेसिपी बनेल झटपट(Poha Instant Dhokla; quick recipe for Breakfast).
पोह्याचा इन्स्टंट ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य
पोहे
रवा
बेसन
अर्धा कप रवा आणि बेसन; कापसासारखी सॉफ्ट, स्पॉन्जी इडली कशी करायची? पाहा इन्स्टंट रेसिपी
दही
आलं
हिरवी मिरची
साखर
मीठ
लसूण
हळद
तेल
इनो
मोहरी
जिरं
कडीपत्ता
पाणी
कृती
पोह्याचा ढोकळा करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक वाटी पोहे घ्या. नंतर त्यात अर्धी वाटी रवा आणि पाव वाटी बेसन घाला. मग त्यात अर्धी वाटी दही, एक इंच आलं, ३ हिरव्या मिरच्या, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ, ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धी वाटी पाणी घालून पेस्ट तयार करा.
भाकरी थापताना तुटते? फुगतच नाही? त्यात घाला '१' पदार्थ; पुरीसारखी फुगेल ज्वारीची भाकरी
पेस्ट तयार केल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात अर्धा चमचा हळद आणि २ चमचे तेल घालून मिक्स करा. नंतर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा. दुसरीकडे कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये स्टॅण्ड ठेवा. एका प्लेटला ब्रशने तेल लावा. बॅटरमध्ये एक चमचा इनो आणि २ चमचे पाणी ओतून मिक्स करा. बॅटर प्लेटमध्ये ओता, आणि प्लेट स्टॅण्डवर ठेवा, आणि त्यावर प्लेट झाका. २० मिनिटांसाठी वाफेवर ढोकळा शिजवून घ्या.
एकीकडे फोडणीची पळी घ्या. त्यात २ चमचे तेल घाला. तेल घातल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिरवी मिरची घालून मिक्स करा. तयार फोडणी ढोकळ्यावर ओतून डिश सर्व्ह करा.