Lokmat Sakhi >Food > २ वाटी पोह्याचे करा चौपट फुलणारे पापड, आमटी-भात आणि खिचडीसोबत खावा असा कुरकुरीत पापड

२ वाटी पोह्याचे करा चौपट फुलणारे पापड, आमटी-भात आणि खिचडीसोबत खावा असा कुरकुरीत पापड

Poha papad Easy recipe : हलकेफुलके आणि भरपूर फुलणारे असे पोह्यांचे पापड कसे करायचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2024 05:02 PM2024-03-04T17:02:32+5:302024-03-04T17:37:10+5:30

Poha papad Easy recipe : हलकेफुलके आणि भरपूर फुलणारे असे पोह्यांचे पापड कसे करायचे

Poha papad Easy recipe : 2 bowls of poha blooming papad, amti-rice, khichdi with mouth-watering crispy recipe... | २ वाटी पोह्याचे करा चौपट फुलणारे पापड, आमटी-भात आणि खिचडीसोबत खावा असा कुरकुरीत पापड

२ वाटी पोह्याचे करा चौपट फुलणारे पापड, आमटी-भात आणि खिचडीसोबत खावा असा कुरकुरीत पापड

आमटी भात असो किंवा खिचडी त्याच्यासोबत काहीतरी तोंडी लावायला असेल की आपल्याला फार बरे वाटते. यामध्ये लोणचं, चटणी, सॅलेड हे तर असेलच पण पापड, कुरडई, बॉबी असे काही कुरकुरीत असेल तर जेवण मस्त होते. पापड म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर साधारण उडदाचे पापड येतात. तांदळाच्या किंवा साबुदाण्याच्या पापड्याही उन्हाळी वाळवणात आवर्जून केल्या जातात. पण आज आपण पोह्यांपासून केले जाणारे हलकेफुलके आणि भरपूर फुलणारे असे पोह्यांचे पापड कसे करायचे याची रेसिपी पाहणार आहोत. नेहमीच्याच जाड पोह्यांपासून हे पापड होत असल्याने आणि त्यासाठी विशेष कष्ट किंवा वेळ लागत नसल्याने घरच्या घरी आपण ही रेसिपी नक्की ट्राय करु शकतो. हे पापड तळल्यावर इतके छान लागतात की ते खाण्यावर नियंत्रण ठेवणे अवघड होऊन जाते. पोह्याच्या पापडांना मिरगुंडही म्हटले जाते. पाहूयात हे पोह्याचे चविष्ट पापड कसे करायचे (Poha papad Easy recipe ). 

१. साधारण २ वाटी पोहे घेऊन ते चाळून घ्यायचे. 

२. मग हे पोहे कढईमध्ये चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. 

(Image : Google)
(Image : Google)

३. गार झाल्यानंतर पोहे मिक्सर मधून बारीक पीठ करुन घ्यायचे. 

४. पुन्हा एकदा चाळून घ्यायचे म्हणजे जाडसर पावडर पापडाच्या पिठामध्ये येणार नाही.

५. या पीठात १ चमचा पापड खार, १ चमचा तिखट, १ चमचा ओवा आणि मीठ घालायचे. 

६. पाणी घालून याचे पोळ्यांसाठी पीठ मळतो त्याप्रमाणे मऊ पीठ मळून घ्यायचे. 

७. चकली किंवा शेव करतो त्या सोऱ्यामध्ये चपटे बॉबी पापड करता येतील अशी एक चकती असते. 

८ या चकतीने पापड घालून ते चांगले ३ ते ४ दिवस उन्हात वाळवयचे. 

९. नंतर हे पापड तळायचे ते मस्त खूप जास्त फुलतात आणि तोंडात टाकले की विरघळतात.
 

Web Title: Poha papad Easy recipe : 2 bowls of poha blooming papad, amti-rice, khichdi with mouth-watering crispy recipe...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.