Join us  

नाश्त्याला पोहे करावे तर कधी कडक-वातड होतात कधी गचगचीत? ५ टिप्स-करा परफेक्ट पोहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 10:43 AM

Poha Recipe For Breakfast : अनेकदा पोहे भिजवलेल्या तांदळासारखेही दिसतात. अशावेळी नाश्त्याची चव बिघडू नये म्हणून काही सोप्या टिप्स पाहूया.

सकाळच्या वेळेचा परफेक्ट नाश्ता म्हणजे पोहे.  काहीजण नाश्त्याला रोज पोहे खातात कर काही घरांमध्ये आठवड्यातून २ ते ३ वेळा पोहे बनतातच. घरी पोहे बनवल्यानंतर लगेच कडक होतात तर गचगचीत अशी अनेकींची तक्रार असते. (How do you remove excess water from poha) परफेक्ट चवीचे पोहे खूप कमी जणींना बनवता येतात. (Kitchen Tips) अनेकदा पोहे भिजवलेल्या तांदळासारखेही दिसतात. अशावेळी नाश्त्याची चव बिघडू नये म्हणून काही सोप्या टिप्स पाहूया. (Cooking Tips & Hacks)

पोहे जास्तवेळ पाण्यात भिजवून ठेवू नका

काहीजण पोहे बनवण्याच्या २० मिनिटं आधीच ते पाण्यात भिजवून ठेवतात. पण ही पद्धत चुकीची आहे.  यामुळे पोहे मोकळे होणार नाहीत पण ओल्या भातासारखे नक्कीच होतील. सर्वात महत्वाची युक्ती म्हणजे कढईत पोहे घालण्यापूर्वी काही मिनिटे पोहे पाण्यात भिजवून लगेच काढून टाकावेत. यानंतर ते एका रुंद ट्रे किंवा प्लेटमध्ये पसरवा जेणेकरून पोहे गोळा होणार नाहीत.

स्टिम करा

पोहे बनवताना जास्त चमच्यानं ढवळू नका, फोडणी आणि भिजवलेले पोहे घातल्यानंतर एकत्र करून पोह्यांवर झाकण ठेवून वाफ काढून घ्या. पोहे वाफवल्यावरच ते मऊ-मोकळे होतात. पोहे बनवण्याआधी २-३ मिनिटे वाफवून देखील घेऊ शकता. दुसरीकडे कढईत पोहे टाकले तर तेही नंतर मध्यम आचेवर वाफवून घ्या.

रोज डाळ-भात खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत करा रेस्टॉरंटस्टाईल दाल खिचडी; घ्या चविष्ट रेसिपी

लिंबू घाला

पोह्यांचा आंबटपणा कमी करण्यासाठी वरून लिंबू घातला जातो. पण तुम्हाला मऊ, मोकळे पोहे शिजवायचे असतील तर पोहे बनवताना वरून लिंबू पिळायला विसरू नका.  या ट्रिकमुळे पोहे चिकटणार नाहीत आणि कडकही होणार नाहीत.

कडक पोह्यांमध्ये पाणी घालू नका

ही ट्रिक तुमच्यासाठी नवीन असेल. पोहे मंद आचेवर ठेवा आणि त्यावर पाण्याचे थेंब शिंपडा. १ मिनिट झाकून ठेवा. अशा प्रकारे पोह्यांना मऊपणा परत येईल.  लक्षात ठेवा की पोहे जास्त वेळ शिजवू नका. यामुळे पोह्यांचा ओलावा कमी होत जाईल.

पोटाचे टायर्स दिसतात, कंबर सुटलंय? १ चमचा तिळाच्या तेलाची जादू; काहीही न करता स्लिम व्हाल

तापमानाकडे लक्ष द्या

पोहे मंद आचेवर शिजवणं किंवा  जास्त आचेवर शिजवणं देखिल चुकीचं आहे. पोहे बनवताना नेहमी गॅस मध्यम आचेवर ठेवा. गॅस बंद करण्यापूर्वी  काही सेकंद मंद आचेवर वाफवून घ्या. उच्च आणि मंद आचेवर पोहे  तळाशी चिकटतात आणि कडक होऊ लागात. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न